अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af
गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली की, दि( १५)मे रोजी ते कुटूंबासह बाहेरगावी गेले होते व सहा दिवसानंतर ते घरी परत आले तेंव्हा त्यांना घराच्या मुख्य लाकडी दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले तसेच त्यांनी बेडरूम मधील कपाट तपासले असता कपाटही तुटलेले दिसले कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीणे व रोख तसेच सिसिटीव्ही चा डीव्हीआर असा एकूण ३७,०००/-  रु चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीच्या तक्रारीवरुन वरून पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अप. क्र. ४७८ / २०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता

अमरावती शहरातील घरफोडींच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरीता पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलिस उपायुक्त  कल्पना बारवकर. सहाय्यक पोलिस आयुक्त. शिवाजी बचाटे यांनी गुन्हे शाखा यांची मिटींग घेवून सदरचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेशीत केल्याने गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे पथकाने गुप्त माहितीचे आधारे तांत्रीक विश्लेषण करून पथकाने अहोरात्र प्रयत्न करून सदरचे गुन्हे उघडकिस आणले

त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त, नविनचंद्र रेडडी यांनी आदेशीत केल्यावरून पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट २ राहुल आठवले, यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून तसेच तांत्रिक विश्लेषणा वरून गुन्हयातील आरोपी १) महबूब खान वल्द समीउल्ला खान, वय ३१ वर्ष रा. लालखडी, इमाम नगर अमरावती, २) मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबिर वय ३१ वर्ष रा. नालसाबपुरा, अमरावती, यांना ताब्यात घेवून त्यांची कसोशीने व कौशल्यपुर्ण पध्दतीने चौकशी करून त्यांना विश्वासात घेवून
गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांचे ताब्यातून अमरावती शहरातील एकूण
१२ घरफोडीच्या गुन्हयातील एकूण ७,२५,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून गुन्हे उघडकिस आणले

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त  कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, सफौ राजेंद्र काळे, पोलिस
अंमलदार  जावेद अहमद, गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment