Cheapest Recharge plans: Jio, Airtel आणि VI सिम सक्रिय ठेवण्यासाठी शोधताय सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, तुमच्यासाठी कोणता बेस्ट? जाणून घ्या

Cheapest Recharge plans: Jio, Airtel आणि VI च्या सिमला सक्रिय ठेवण्यासाठी युजर्सना आता आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर, जर तुम्हाला केवळ सिम सक्रिय ठेवण्यासाठी जिओ, एअरटेल किंवा वीआयचा स्वस्त प्लॅन शोधायचा असेल तर येथे आम्ही अशाच काही प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वीआय या तीनही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ज्या प्लॅनसाठी आधी 239 रुपये द्यावे लागत होते, आता त्याची किंमत 299 रुपये झाली आहे. अशा परिस्थितीत सिम सक्रिय ठेवण्यासाठी युजर्सना खूप अडचण येत आहे. पण Jio, Airtel आणि VI चे सिम सक्रिय ठेवण्यासाठी काही असे प्लॅन्स आहेत, जे युजर्सना मदत करू शकतात.

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन सिम सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात चांगला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 14 दिवसांची व्हॅलीडीटी मिळते. यामध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते. वापरकर्त्यांसाठी 1 जीबी डेटा रोलओवर करण्यात येतो.

एअरटेल युजर्सनी असे ठेवावे सिम सक्रिय

एअरटेलच्या या युजर्समध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. सिम सक्रिय ठेवण्यासाठी एअरटेल युजर्ससाठी हा युजर्स सर्वात चांगला आहे. यासाठी 199 रुपये खर्च करावे लागतात. आधी हा प्लॅन 179 रुपयांचा होता, परंतु टॅरिफ वाढल्यानंतर त्याची किंमत 199 रुपये झाली आहे.

VI चा स्वस्त रिचार्ज प्लॅन

सिम सक्रिय ठेवण्यासाठी वीआयच्या युजर्सना 15 दिवसांसाठी 99 रुपये द्यावे लागतात. यामध्ये 200 एमबी डेटा आणि टॉकटाइमसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे शुल्क घेतले जाते. या प्लानमध्ये वापरकर्त्यांना एसएमएसची सुविधा मिळत नाही.

हे तिन्ही प्लॅन्स विशेषतः अशा युजर्ससाठी आहेत ज्यांना केवळ सिम सक्रिय ठेवण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा आहे.

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Cheap recharge plansTelecom recharge pricesVI स्वस्त रिचार्ज प्लान्सएअरटेल सिम प्लॅन्सजिओ रिचार्ज प्लॅन
Comments (0)
Add Comment