Shocking News: तरुणाला साप दोनदा चावला, तो सापाला तीनदा चावला; साप मेला, तरुण जिवंत; खास टेक्निक सांगितली

पाटणा : आपण कधी ऐकलंय का माणसाने सापाला चावलं आणि साप मेला? आश्चर्य वाटलं ना, पण खरंच असं घडलं आहे. सापाने आपल्याला चावल्याने त्याच्या बदल्यात एका तरुणाने सापाला चावलं आणि यात सापाचा मृत्यू झाला आहे. याबाबत तरुणाने स्वत: कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, मी सापाला तीन वेळा चावले आहे आणि त्याची प्रकृती ही स्थिर आहे.

ही आश्चर्यजनक घटना आहे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. येथील वनक्षेत्रात रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यासाठी काम करणारे काही कामगार मंगळवारी २ जुलैला बेस कॅम्प मध्ये झोपले होते. यादरम्यान या कॅम्पमध्ये साप आला. त्याने त्यातील तरुण कामगाराला चावले. तरुणाला सापाने चावल्याचा राग आला. रागाच्या भरात त्याने सापाला पकडले आणि त्याला चावले. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला रुग्णालयात भर्ती केले.
Viral Video : बंद कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत सापडला ‘कोळी कीटक’, व्हिडिओ झाला व्हायरल
तरुणाचे नाव संतोष लोहार असून झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. त्याने घटनेबद्दल सांगताना काही आगळंच कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘माझ्या गावात एक युक्ती आहे की, जर तुम्हाला सापाने एकदा चावला तर तुम्ही त्याला दोनदा चावा, यामुळे तुमच्या शरीरात सापाचे विष परसण्यापासून रोखता येईल. ही युक्ती लढवूनच मी सापाला चावलं. सापाने मला दोनदा दंश केला या बदल्यात मी त्याला तीनदा चावले. पण सापाला चावण्याचे एक खास तंत्र आहे. सापाला आधी तोंड आणि शेपटीच्या बाजूने धरा आणि मध्यभागी तीन वेळा चावा.’
दारु विक्रेत्याचा विचित्र प्रताप, पोलीस सुद्धा चक्रावले; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
संतोष लोहारवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत डॉक्टर सतीश चंद्र यांनी सांगितले की, सर्पदंशावरील उपचार सुरु होते, यामध्ये आता तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, या घटनेची बातमी क्षणातच आसपासच्या परिसरात परसली. तरुणाचा हा अजब कारनामा समजताच परिसरातील लोकांनी त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

Source link

bihar newsman bite snakesnake tragedystrange action in biharyouth bitten by snakeअजब कारनामाआश्चर्यजनक घटनातरुणाला चावला सापमाणसाशी सापाची दुश्मनीसाप चावण्याचे तंत्र
Comments (0)
Add Comment