Jio TV OS: भारतात रिलायन्स जिओच्या टीव्ही ओएसची टेस्टिंग सुरु झाली आहे. लवकरच जिओ आपले हे प्रोडक्ट बाजारपेठेत लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कशी असेल कंपनीची ही टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम याकडे एक नजर टाकूया..
भारतात Jio TV OS ची टेस्टिंग
ET च्या रिपोर्टनुसार, Jio TV OS ची भारतात टेस्टिंग सुरू झाली आहे, याचा अर्थ लवकरच याचा लाँच होणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम टेस्ट करण्यासाठी रिलायन्सने स्थानिक टीव्ही उत्पादकांशी हातमिळवणी केली आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम Google च्या Android प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. बाजारात Amazon आपला Fire TV OS काही टीव्ही OEMs ना देतो, तर Samsung, LG, Skyworth आणि Hisense आपल्या टीव्हीमध्ये अनुक्रमे Tizen OS, webOS, Coolita OS आणि Vidaa OS वापरतात. त्यामुळे स्पर्धेत तग धरण्यासाठी रिलायन्स आपला Jio TV OS मोफत देण्याचा विचार करत आहे.
बीटा टेस्टिंग आणि फीडबॅक
रिपोर्ट पुढे सांगतो की, रिलायन्स आपला Jio TV OS बीटा टेस्ट करण्यासाठी, फीडबॅक गोळा करण्यासाठी आणि बग फिक्स करण्यासाठी स्थानिक टीव्ही उत्पादकांशी सहकार्य करत आहे. तसेच, कंपनी BPL आणि Reconnect ब्रँड्सच्या 4K आणि FHD टीव्ही लाँच करून एंट्री लेवल मार्केटला लक्ष्य करत आहे. भारतीय निर्मात्यांना OS चा फ्री लाइसेंस देण्याचाही विचार आहे.
Jio TV OSचे फायदे
कंपनीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, Jio TV OS कंपनीला JioCinema सारख्या आपल्या अॅप्सचे बंडलिंग, जाहिरात महसूल निर्माण करण्याची आणि Jio ब्रॉडबँड सेवा पॅकेज करण्याची संधी देईल. तसेच, रिलायन्स जिओ टीव्ही ओएस ला आकर्षक बनवण्यासाठी कोणतीही लाइसेंसिंग फीस घेणार नाही. Jio TV OS ओपन सोर्स असल्यामुळे स्मार्ट टीव्ही आणि इतर div अॅप विकासालाही मदत करेल.