सतीश पुनिया यांच्याकडे हरयाणाची जबाबदारी
विनोद तावडे यांच्यासह तरुण चुघ यांच्याकडे जम्मू व काश्मीर तर राधामोहनदास अग्रवाल यांच्याकडे कर्नाटक या राज्याचे प्रभारीपद कायम राहिले आहे. भाजप नेतृत्वाने सतीश पुनिया यांच्याकडे हरयाणाची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रासोबत हरयाणात या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
ओडिशाचे प्रभारी कोण?
बिहारमधील भाजप आमदार नितीन नबिन हे छत्तीसगड, आशिष सूड हे गोवा, श्रीकांत शर्मा हे हिमाचल प्रदेश, लक्ष्मीकांत बाजपाई हे झारखंड, महेंद्र सिंह हे मध्य प्रदेश आणि विजयपाल सिंह हे ओडिशा या राज्यांचे प्रभारी असतील.
ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्याकडे अनुक्रमे पंजाब आणि उत्तराखंड या राज्याची जबाबदारी कायम राहिली आहे. तसेच भाजपचे ओडिशातील खासदार संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक म्हणून जबाबदारी कायम राहिली आहे.पक्षाने बहुतांश राज्यांसाठी सहप्रभारी नियुक्त केले होते. राज्य प्रभारी हे राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. महाराष्ट्रासोबत हरयाणात या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
‘मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळेल’ – लालू प्रसाद
पाटणा :‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कमकुवत असून, ते ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पडू शकते,’ असा अंदाज ‘राष्ट्रीय जनता दला’चे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी शुक्रवारी व्यक्त केला. पक्षाच्या स्थापनेला २८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘यंदाच्या निवडणुकीत ‘आरजेडी’ने मतांची टक्केवारी सुधारली आहे. यातून ताकद मिळवून सरकार पडल्यास त्यासाठी तयार राहा,’ असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. ‘आरजेडी हा बिहार विधानसभेतील काही काळापासून सर्वांत मोठा पक्ष आहे. त्याबरोबरच इतरांसारखी विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही,’ असा टोमणाही त्यांनी लगावला.