Rahul Gandhi: भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींंचा PM मोदींवर हल्ला; अयोध्येत पराभव केला, आता गुजरातमध्ये करणार

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आज (शनिवार) गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. अयोध्ये प्रमाणेच गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याच बरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते कोणालाही घाबरत नाहीत असे ते म्हणाले.

पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तुम्ही लालकृ्ष्ण अडवाणी यांना रथयात्रेत पाहिले होते. तेव्हा त्यांना मोदींनी मदत केली होती असे बोलले जाते. मी संसदेत बसल्यावर विचार करत होतो की, राम मंदिरातील कार्यक्रमात अदानी-अंबानी दिसले पण गरीब व्यक्ती दिसले नाहीत. भाजपचे संपूर्ण राजकारण अयोध्येवर केंद्रीत होते. त्यांनी श्री रामचा मुद्दा राजकीय केला. मी लोकसभेत अयोध्येच्या खासदारांना विचारले की, भाजपने निवडणुकीच्या आधी राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली. पण इंडिया आघाडीचा अयोध्येत विजय झाला. हे काय झाले?

यावर अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद म्हणाले, राहुलजी मला माहिती होते की, अयोध्येतून माझा विजय होणार आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी लोकांच्या जमिनी घेतल्या, अनेकांची घरे आणि दुकाने तोडली गेली त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. अयोध्येत मोठे विमानतळ झाले त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन गेली. पण अद्याप त्याची नुकसान भरपाई दिली गेली नाही. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेत अयोध्यावासी नव्हते.

मोदींना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती- राहुल गांधी

मोदींना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती. पण ३ सर्व्हे झाले. जर अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर पराभव होईल आणि राजकीय करिअर संपुष्ठात येईल. वाराणसीत एक लाखाच्या अंतराने किमान विजय तरी झाला, असे अयोध्येच्या खासदाराने आपल्याला सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आता आपण यांना धडा शिकवू आणि याचे सरकार पाडू. गुजरातमध्ये आपण भाजपचा पराभव करू असे राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना म्हणाले. राहुल गांधी यांनी यावेळी गेम झोन दुर्घटना, मोरबी ब्रिज आणि सूरत दुर्घटनेतील पिडितांशी भेट घेतली.

Source link

bjp in gujaratNarendra ModiRahul Gandhiwe will defeat bjp in gujarat rahul gandhiराहुल गांधी गुजरात दौऱ्यावर
Comments (0)
Add Comment