Parenting Apps: तुमच्या मुलांना वाचवा सायबर धोक्यांपासून; ‘हे’ पॅरेंटिंग ॲप्स करतील मदत

Parental Control Apps: गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि डिजिटल जगाची लोकांमध्ये अधिक चर्चा होऊ लागली आहे. मुलांसाठीही हा माहितीचा खजिना आहे, परंतु नियंत्रण न ठेवता त्याचा वापर केल्यास आपल्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.अशा परिस्थितीत, ‘Parental Control App’ पालकांना त्यांच्या मुलाच्या ऑनलाइन एक्सपेरियन्सवर लक्ष ठेवण्यास मदत करू शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजच्या डिजिटल युगात बहुतांश काम ऑनलाइन केले जाते. अशा परिस्थितीत, लहान मुलेही ऑनलाइन जगामध्ये अधिकाधिक रमत आहेत, त्यामुळे पालकांना डिजिटल क्षेत्रात त्यांच्या सुरक्षिततेची चिंता आहे. या परिस्थितीत, पालक नियंत्रण ॲप (Parental Control App) तुमच्या मुलाच्या डिजिटल जगावर लक्ष ठेवते. हे ॲप्स तुमच्या मुलांवर ऑनलाइन लक्ष ठेवतील, त्यांना सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवतील. येथे अशाच काही ॲप्सबद्दल आज माहिती देतआहोत.

स्क्रीन टाइम करा मॅनेज

ही ॲप्स तुम्हाला तुमच्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करण्यात, स्क्रीन टाइम मॅनेज करण्यात आणि सुरक्षित डिजिटल वातावरण तयार करण्यात मदत करतात.

कसे निवडावे योग्य ॲप

असे अनेक ॲप्स आहेत जे पॅरेंटल कंट्रोलसह इतर अनेक फीचर्स देतात. पण तुम्हाला तुमच्यासाठी योग्य ॲप निवडावे लागेल, जे तुमच्या गरजेनुसार काम करते.
असे बरेच ॲप्स आहेत जे डिलीट केलेले मेसेज वाचण्याची सुविधा देतात. पण हे मुलांवर लक्ष ठेवणे नाही तर त्यांची हेरगिरी करणे होईल. .
अशा परिस्थितीत आपल्या मुलांमध्ये पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही त्यांना योग्य दिशा देऊ शकाल आणि ते तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतील. हे ॲप मुलांच्या डिजिटल वावरावरील नियंत्रणासाठी सर्वोत्तम आहे

Parental Control Apps

uMobix

तुम्हाला या ॲपमध्ये अनेक फीचर मिळतात. रिअल-टाइम GPS ट्रॅकिंग, स्क्रीन टाइम कंट्रोल, ॲप ब्लॉकिंग आणि टेक्स्ट मेसेज मॉनिटरिंग यांसारखी फीचर यामध्ये मिळू शकतात.

EyZy

याशिवाय, EyZy हे आणखी एक ॲप आहे जे टेक्स्ट मेसेज मॉनिटरिंग, ब्राउझर हिस्ट्री ट्रॅकिंग, ॲप ब्लॉकिंग आणि लोकेशन ट्रॅकिंग पुरवते.

बार्क

हे ॲप मेसेज फिल्टरसारखे काम करते. वेगवेगळ्या ॲप्समधून येणाऱ्या मेसेजेसमधील सायबर धमक्यांसारखे संभाव्य धोके शोधण्यासाठी ते AI वापरते. या व्यतिरिक्त, यात वेब फिल्टरिंग आणि टाईम लिमिट सारखी फीचर आहेत, जी तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम देखील मॅनेज करू शकतात.

mSpy

हे ॲप मेसेजेस (डिलीट केलेल्यासह), सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आणि वेब ब्राउझिंगचे निरीक्षण करते. याशिवाय जिओ-फेन्स आणि स्क्रीन टाईम लिमिटची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे.

या गोष्टी ठेवा लक्षात

  • ऑनलाइन सेफ्टी आणि Parental Control Apps चा उद्देश आणि संबंधित ॲप्स जबाबदार डिजिटल सवयींना कसे प्रोत्साहन देतात याबद्दल तुमच्या मुलाशी मोकळेपणाने बोला.
  • कोणतेही ॲप निवडताना तुमच्या गरजा आणि तुमच्या मुलाचे वय विचारात घ्या.
  • पालक नियंत्रण ॲप्स हे मार्गदर्शन आणि सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे साधन आहे. हे हेरगिरी ॲप म्हणून वापरणे चुकीचे ठरेल.
  • या ॲप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाला ऑनलाइन जग सुरक्षितपणे आणि जबाबदारीने नेव्हिगेट करण्यासाठी सक्षम करू शकता.

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

kids digital safetyparental control appsऑनलाईन फ्रॉडपासून कसा करावा बचावलहान मुलांचा स्क्रीन टाईमसायबर धोके
Comments (0)
Add Comment