Microsoft Edge Alert: मायक्रोसॉफ्ट एज यूजर्सना सरकारने दिला गंभीर इशारा, या धोक्यापासून काळजी घेणे आवश्यक

Microsoft Edge Alert: मायक्रोसॉफ्ट एज यूजर्ससाठी सरकारने सूचना जारी केली आहे. सरकारसाठी काम करणारी संस्था, कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT) ने या ब्राउजरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. या वॉर्निंगमध्ये म्हटले आहे की जुने वर्जन वापरणाऱ्या यूजर्ससाठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून या काळात कोणत्या गोष्टींची खास काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सरकारने मायक्रोसॉफ्ट एज यूजर्ससाठी कडक सूचना दिल्या आहेत. कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT) ने मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजरमध्ये काही त्रुटी शोधल्या आहेत, ज्यामुळे जुन्या वर्जन वापरणाऱ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. यूजर्सनी ब्राउजरचे लेटेस्ट वर्जन वापरावे आणि अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये. तसेच, कंपनीच्या लेटेस्ट अपडेटची माहिती घेऊन योग्य ठिकाणाहूनच अपडेट इंस्टॉल करावे.

कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Microsoft Edge यूजर्ससाठी कडक वॉर्निंग जारी केली आहे. या संस्थेने अशा यूजर्सना सुचना दिली आहे जे Microsoft Edge चा 126.0.2592.81 वर्जन किंवा त्यापूर्वीचे वर्जन वापरत आहेत. अशा यूजर्सनी आपल्या सुरक्षेसाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात केलेली एक छोटीशी चूकही तुमच्या पर्सनल डेटाला हानी पोहोचवू शकते.

सरकारने या वर्जनच्या यूजर्सना दिल्या कडक सूचना

CERT च्या मते, Microsoft Edge चा 126.0.2592.81 वर्जन किंवा त्यापूर्वीचे वर्जन पूर्णपणे सुरक्षित नाही. यात काही सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत ज्या यूजर्सच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. यात काही क्रोमियम आधारित त्रुटी संस्थेने शोधल्या आहेत. संस्थेने म्हटले आहे की या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स यूजर्सच्या पर्सनल सिस्टिमवर हल्ला करू शकतात आणि माहिती देखील चोरू शकतात.

यूजर्सने काय करावे?

या त्रुटींमुळे स्वतःच्या सिस्टिमला सुरक्षित ठेवण्यासाठी यूजर्सने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम, ब्राउजरचे लेटेस्ट वर्जन वापरत असल्याची खात्री करा. कुठूनही आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. असे करणे धोकादायक ठरू शकते. कंपनीच्या लेटेस्ट अपडेटची माहिती ठेवा. जर कोणते नवीन अपडेट मिळाले तर ते योग्य ठिकाणाहूनच इंस्टॉल करा.

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Cybersecurity vulnerabilitiesOutdated browser risksइंटरनेट ब्राउजर सुरक्षामायक्रोसॉफ्ट एज जुने वर्जनसायबर सुरक्षा धोके
Comments (0)
Add Comment