Kulgam Encounter: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ४ दहशतवादी ठार, तर १ लष्करी जवान शहीद

जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये शनिवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. या भागात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला. तर दुसरीकडे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत कुलगाम जिल्ह्यात लष्करी जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा डिव्हिजन कमांडर फारुख नल्ली याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
Supriya Sule: राज्यातील स्थिती अत्यंत भयानक, गुन्हेगारीचे केंद्र नागपूर ऐवजी पुणे बनत चालले- सुप्रिया सुळेंचा आरोप
सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. कुलगाममधील पहिल्या चकमकीनंतर काही तासांनी जिल्ह्यातील आणखी एका फ्रिसाल गावातील चिंगम भागात चकमक सुरू झाली. या परिसरात लष्कराचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई केली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झाल्याची माहिती दिली होती.

एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा कर्मचारी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील मोडरगाम गावात घेराबंदी आणि शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले असून, अजूनही जोरदार गोळीबार सुरू आहे. तथापि, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच त्यांची ओळख निश्चित केली जाऊ शकते. सुरक्षा दलांना विशिष्ट सूचना मिळाल्यानंतर चिन्निगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. कुलगाममधील मोडरगाम भागात झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला.

गेल्या काही दिवसांपासून या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या महिन्यातच सुरक्षा दलांनी डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात तीन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला होता. यापूर्वी पुलवामा येथे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोन दहशतवादी लश्कर-ए-तैयबाच्या एका शाखेतील रेझिस्टन्स फ्रंटचे दोन टॉप कमांडर होते. जे पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लपण्यासाठी वापरत असलेल्या घरात अडकले होते. तर ९ जून रोजी, रियासी जिल्ह्यातील शिव खोरी गुंफेपासून कटरा येथे जाणारी बस पोनी भागातील तेर्याथ गावात दहशतवादी हल्ल्यात पडल्याने दहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.

Source link

Jammu Kashmir Encounterjammu kashmir newsjammu-kashmir terrorist killedkulgam encounterkulgam encounter newskulgam terrorist killedकुलगाम दहशतवादी ठारजम्मू-काश्मीर चकमकजम्मू-काश्मीर दहशतवादी ठारजम्मू-काश्मीर बातमी
Comments (0)
Add Comment