महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
अट्टल दुचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले ०२ गुन्हे….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(३०)जुन रोजी संध्या ४.३० वा. चे सुमारास, फिर्यादी रविंद्र गंगारात खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नागपुर हे पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी त्यांची आयस्मार्ट मोटारसायकल क्र. एम. एच. ४९ आर. ६५९८ किंमत अंदाजे ३५,०००/- रू. ची पार्क करून हॅन्डल लॉक करण्यास विसरले होते ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणाहुन चोरून नेली.यावरुन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा. दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे पाचपावली येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, सापळा रचुन संशयीत आरोपी व सराईत वाहन चोरटा बादल उर्फ गुंडर संजय राऊत, वय ३१ वर्षे, रा. आदर्श नगर, पाचपावली, नागपुर यास ताब्यात घेवुन, विचारपुस केली असता, त्याने वर नमुद मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.त्यानुसार आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे ताब्यातुन आयस्मार्ट मोटारसायकल क्र. एम. एच. ४९ आर. ६५९८ किंमती अंदाजे ३५,००० /- रू. ची जप्त करण्यात आलेली आहे
तपासादरम्यान आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने नमुद गुन्हयाव्यतीरिक्त पोलिस ठाणे नवी कामठी हद्दीतुन ग्रे रंगाची होंडा शाईन दुचाकी क्र. एम.एच ४० बि.टी. ०१७७ किंमत ५०,००० /- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली.अशाप्नकारे ०२ गुन्हे उघडकिस आणुन त्याचे ताब्यातुन एकुण ८५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नागपूर शहर,डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त,अपर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परि. क्र. ३)गोरख भामरे,सहा. पोलिस आयुक्त (लकडगंज विभाग)श्वेता खाडे यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. बाबुराव राऊत, सपोनि. प्रविण सोमवंशी, पोहवा. ज्ञानेश्वर भोगे, नापोशि. ईमरान शेख, रोमेश
मेनेवार, राहुल चिकटे, पोशि गगन यादव, संतोष शेंद्रे व महेंद्र शेलोकार यांनी केली.