आजचे राशीभविष्य ७ जुलै २०२४: वृषभसह ३ राशींना पैसाची कमतरता भासेल! कुटुंबातील वातावरण खराब होईल, वाचा रविवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 7 july 2024 :
आज ७ जुलै आषाढ शुक्ल द्वितीय असून रविवार आहे. आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होईल. पुष्य नक्षत्रासह हर्षण योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे वृषभसह ३ राशींना पैशांची चिंता सतावेल. तुमचा आत्मविश्वास पाहून विरोधक पराभूत होतील. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. लव्ह लाईफ मजबूत होईल. तुमची मुले आज अपेक्षा पूर्ण करतील. मित्रांसोबत फिरायला जाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष- नवीन काम सुरु कराल

तुमच्या व्यवसायात धैर्याने आणि समर्पित भावनेने आज काम करावे लागेल. आज काम पूर्ण होताना दिसेल. तुमचा आत्मविश्वास पाहून विरोधक पराभूत होतील. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे उत्साही असाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन काम सुरु करण्यासाठी ही वेळ उत्तम असेल. आर्थिक परिस्थिती चिंतेचे कारण ठरेल. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळा.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

वृषभ – आर्थिक चिंता सतावेल.

आज जुना मित्र भेटल्याने तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक गोष्टींबद्दल चिंतेत असाल. घरात वातावरण तणावाचे असेल. आर्थिक परिस्थिती चिंतेचे कारण ठरेल. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळा. तुम्हाला हुशारीने काम करावे लागेल. व्यवसायात कोणाशी वाद होऊ शकतो.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ म्हणा

मिथुन – पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कौटुंबिक जीवनासाठी आजचा दिवस त्रासदायक असेल. कुटुंबात काही समस्या उद्भवू शकतात. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसायात तुम्ही करत असलेल्या कामाला विरोध होईल. वरिष्ठांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला

कर्क- मित्रांसोबत फिरायला जाल

आजचा दिवस तुमच्यासाठी सुख आणि दु:ख दोन्ही घेऊन येईल. काळजी करु नका. अपूर्ण राहिलेली कामे आज शहाणपणाने सोडवा. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्यात यश मिळेल. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. लव्ह लाईफ मजबूत होईल. तुमची मुले आज अपेक्षा पूर्ण करतील. मित्रांसोबत फिरायला जाल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

सिंह – जोडीदाराशी वाद होईल

आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. व्यवसायात तुमची ओळख वाढेल. कोणतीही नवीन डील फायनल होऊ शकते. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस खर्चिक असेल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा काळ उत्तम. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र किंवा अन्न दान करा

कन्या – कुटुंबात समन्वय साधा.

आज तुम्ही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता ज्यामुळे दिवस चांगला जाईल. मनात शांतीची भावना असेल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कुटुंबात समन्वय साधा. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. व्यवसायात हुशारीने काम केल्यास यश मिळेल. वडिलांचा सल्ला घ्या. कोणाशीही वाद करु नका.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा

तुळ – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्ही कार्यक्षेत्रात आदर आणि प्रभावाने काहीतरी साध्य कराल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. डोळे आणि पोटाचे विकार उद्भवतील. त्यासाठी आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर काम केल्यास चांगली संधी मिळेल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीविष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

वृश्चिक – जोडीदाराकडून सहकार्य मिळेल

आज आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणुकीच्या योजना आखाल. ज्यामुळे भविष्यात चांगला नफा होईल. मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल. शेजाऱ्यांशी वाद घालणे टाळा. कुटुंबात समन्वय राखणे गरजेचे आहे. जोडीदाराकडून आवश्यक सहकार्य मिळेल. काही कठीण कामही आज होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.

धनु – पैशांची कमतरता भासेल

आज कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी असेल. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या धोरणावर काम केल्याने नाराज असाल. मुलांसाठी भेटवस्तू खरेदी कराल. कुटुंबात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. वडिलांचा सल्ला घ्या. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशांची कमतरता भासेल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा

मकर – नात्यात सुधारणा होईल

तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लव्ह लाईफसाठी वेळ नसेल. जोडीदार नाराज राहिल. समर्पण, संयम आणि कठीण परिश्रमाने ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील कलह थांबेल. नात्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. सामाजिक आणि राजकीय कार्यात रुची वाढेल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्रचे पठण करा

कुंभ – आई-वडिलांची साथ मिळेल

आज तुम्हाला व्यावसायिक कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल. तुमचे काम पूर्ण होताना दिसेल. वाद घातल्याने नुकसान होईल. आई-वडिलांची साथ मिळेल. कामाचे नियोजन केल्याने यश मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहिल. कुटुंबातील सदस्य व्यस्त राहातील.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा

मीन – कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील

आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, अपचन आणि गॅसचे विकार उद्भवतील. कौटुंबिक जीवनात ताळमेळ राहिल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपती चालीसाचे पठण करा

Source link

7 july horoscope7 july rashi bhavishyaAajche Rashi Bhavishya 7 july 2024daily astrologydaily horoscope in Marathi 7 july 2024daily rashi bhavishya 7 july 2024Horoscope Today 7 july 2024 In marathitoday horoscopeToday Horoscope in Marathitoday rashi bhavishya 7 july 2024today rashifalआज राशीफलआजचे राशी भविष्यआजचे राशीभविष्य मराठीतदैनिक राशिभविष्यदैनिक राशी भविष्यराशिभविष्य आज७ जुलै राशिभविष्य
Comments (0)
Add Comment