आदिवासी विभागातील कथित घोटाळा; हिंगोलीतून आणखी एकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

हायलाइट्स:

  • १०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार
  • ईडीने चौकशीसाठी आणखी एकाला घेतलं ताब्यात
  • चौकशीनंतर होणार महत्त्वाचा खुलासा?

वाशिम : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांची १०० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात आता बाफना, व्यास, जाधव आणि हिंगोलीचे नेनवाणी बंधू यांचं नाव समोर आलं आहे. यापैकी सुनिल नेनवाणी यांना ईडीने चौकशीसाठी हिंगोली येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या कथित भ्रष्टाचार प्रकरणात भावना गवळी यांचे निकटवर्तीय तथा व्यावसायिक भागीदार असलेल्या सईद खान यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या कबुली जबाबातून आदिवासी विभागात २३१ कोटी रुपयांचा खाऊ घोटाळा झाला असल्याची माहिती त्यांच्याकडून समोर येत आहे.

Aryan Khan मोठी बातमी: आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला फैसला

यामध्ये बाफनाच्या नॅसकॉफ कंपनीचा ५० टक्के व इतर साथीदारांचा ५०टक्के हिस्सा आहे. या प्रकरणाचा शेवट महाराष्ट्रातील एका प्रसिध्द मोठ्या सत्ताधीश राजकीय घराण्यापर्यंत जाईल, लवकरच हे नाव समोर येईल, असा दावा तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात एकूण पाच जण सहभागी असून हिंगोली येथील एकाला ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ता हरीश सारडा यांनी वाशिम इथं बोलताना दिली आहे.

Source link

bhawana gavliShivsenaईडीची कारवाईखासदारभावना गवळीयवतमाळवाशिमशिवसेना
Comments (0)
Add Comment