Shankaracharya Support Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी ‘हिंदू’ बद्दल केलेल्या विधानाला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं समर्थन

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणात हिंदूंविषयी एक विधान केले होते. राहुल गांधींच्या या भाषणानंतर भाजपने व काही हिंदू संघटनांनी त्यांचा निषेध केला होता. अशातच आता ज्योतिर मठाचे ४६ वे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींच्या विधानाला समर्थन दिले आहे.

राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य चुकीचे नाही

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” राहुल गांधी यांचं संसदेतलं संपूर्ण भाषण मी ऐकलं. हिंदू धर्मात हिंसेला स्थानच नाही.असे राहुल गांधी स्पष्टपणे सांगत आहेत. राहुल गांधी कुठेही हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत. त्यांनी समोरच्या लोकांना उद्देशून हिंदू हिंसा करतात असं म्हंटलं होतं. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्याचा अर्धा भाग पसरवणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे”.

राहुल गांधींचं वक्तव्य काय होत ?

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्ताव चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांवर जातीय आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला होता. राहुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ”जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसाचार पसरवतात” असं म्हणाले होते. त्यानंतर भाजपने व हिंदू संघटनांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
Hathras Stampede Case: विषारी पदार्थामुळेच सत्संगात चेंगराचेंगरी; भोलेबाबाच्या वकिलांचा षडयंत्र असल्याचा दावा

राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग हटवला

(1 जुलै) रोजी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणातून काही भाग हटवण्यात आला आहे. राहुल यांनी संसदेत सुमारे 90 मिनिटांचे भाषण केले. यादरम्यान त्यांनी 20 हून अधिक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. हिंदू, अग्निवीर, शेतकरी, मणिपूर, नीट, बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी,एमएसपी, हिंसा, भय, धर्म, अयोध्या, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, लडाख,अदानी-अंबानी,आरएसएस पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या संबंधित मुद्द्यांवर बोलले होते. त्यातील काही भाग हा काढून टाकण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले की, माझा भाऊ (राहुल) कधीही हिंदूंच्या विरोधात बोलू शकत नाही. त्यांनी भाजप आणि भाजप नेत्यांबद्दल भाष्य केले आहे”. त्यामुळे आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या समर्थनामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

Source link

rahul gandhi newsrahul gandhi on hindutvaRahul Gandhi TOPICshankaracharya avimukteshwaranandaShankaracharya Support Rahul Gandhiअविमुक्तेश्वरानंद न्यूजराहुल गांधी न्यूजराहुल गांधी हिंदुत्वशंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य
Comments (0)
Add Comment