विनयभंगाच्या आरोपातील कैद्याचा कारागृहात मृत्यू; मात्र कुटुंबाने केला गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू
  • बुलडाणा जिल्ह्यात धक्कादायक घटना
  • कुटुंबाने पोलीस प्रशासनावर केले गंभीर आरोप

बुलडाणा : जिल्हा कारागृहात विनयभंगाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र सुपडाजी डांगे असं मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे.

अत्यावस्थेत कारागृह सुरक्षारक्षकांनी डांगे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Aryan Khan Bail Plea: ‘आर्यन कोण हे इथे गौण; हवे तर कठोर अटी लावा, पण…’; देसाईंचा जोरदार युक्तिवाद

राजेंद्र डांगे व त्यांच्या मुलावर नांदुरा पोलीस ठाण्यात ३१ जुलै रोजी विनयभंग, दरोडा अशा आरोपात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून दोघे वडील आणि मुलगा जिल्हा कारागृहात होते. मात्र आज सायंकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने सुरक्षारक्षकांनी रुग्णालयात दाखल केलं.

‘डांगे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. त्याचा त्यांना मनस्ताप होत होता. चार ते पाच दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात भरती करण्यात यावे, असा लेखी अर्ज डांगे यांनी दिला होता. तब्येत खराब असूनही त्यांच्यावर वेळेत उपचार केले नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डांगे यांचा मृत्यू झाला,’ असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, राजेंद्र डांगे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अडकवणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णालय परिसरात गर्दी पाहता जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Source link

Buldana NewsBuldana policeकारागृहबुलडाणाबुलडाणा पोलीस
Comments (0)
Add Comment