2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक आहे. येत्या तीन ते चार महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा देण्यात आहे.
आम्ही जनतेचे आभारी आहोत
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,” शरद पवारांचा पक्ष काढून घेण्यात आला. त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. पण जनतेने शरद पवार यांना आशीर्वाद दिले. त्याबद्दल आम्ही सर्वजण जनतेचे आभारी आहोत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे आम्हाला देणगी स्वीकारता येणार असून कराचा लाभ घेता येणार आहे”.
चिन्हात बदल करण्यात येऊ नये
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ” तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आम्ही लोकसभा निवडणूक लढवली आहे. आता पुढे येणारी आगामी विधानसभा निवडणूक देखील याच चिन्हावर लढणार आहोत. परंतु काही मतदारसंघांमध्ये चिन्हावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आमच्या सारखे चिन्ह दुसऱ्या कुणाला देण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही केली आहे”.