मोदींच्या योजनेचा भलताच वापर; आवास योजनेमुळे ११ जणांच्या नशिबी वनवास; चक्रावून टाकणारा प्रकार

लखनऊ: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मोदी सरकारनं पंतप्रधान आवाज योजना आणली. या योजनेचा लाभ शहर, गावातील लाखो लोकांना आहे. ज्या गावांमध्ये पक्की घरं बांधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागायचे, त्या गावांमध्ये आवास योजनेमुळे कमी वेळात पक्की घरं बांधली गेली. घरकुलाचं स्वप्न पूर्ण करता करता अनेकांचं आयुष्य खर्ची पडतं. आवास योजनेमुळे घराचं स्वप्न फारशा कष्टांशिवाय सहज पूर्ण होऊ लागलं. पण उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये या योजनेचा उलटा परिणाम झाला आहे.

आवास योजनेमुळे संसार सुखाचा होईल असं महाराजगंजमधील ११ पतींना वाटत होतं. पण आवास योजना त्यांच्यासाठी वनवास ठरली. आवास योजनेचा पहिला हफ्ता मिळताच ११ पत्नींनी घरातून पळ काढला. त्या त्यांच्या प्रियकरांसोबत पळून काढल्या. आता या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. महिलांचे पती आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. पीएम आवास योजनेचे पुढील हफ्ते देऊ नका, अशी विनवणी पती मंडळी सरकारी अधिकाऱ्यांकडे करत आहेत. अधिकाऱ्यांनीदेखील पुढील हफ्ते बँक खात्यात जमा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत.
अंधारात ६ तास रणगाड्यावर, पण मदत मिळाली नाही; लडाखमधील नदीत बुडण्याआधी जवानांसोबत काय घडलं?
महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल ब्लॉकमधील १०८ गावांमध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएम आवास योजनेसाठी २३५० जणांची निवड केली गेली. यातील जवळपास ९० टक्के लाभार्थ्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. या योजनेत महिलांचाही समावेश आहे. ब्लॉक क्षेत्रात येणाऱ्या ठूठीबारी, शितलापूर, चटिया, रामनगर, बकुलडिहा, खेसहरा, किशनपूर आणि मेधौली गावातील अनेकांना आवास योजनेचा फायदा झाला. या गावातील ११ महिलांना झालेल्या लाभाची चर्चा मात्र सध्या देशभरात आहे.
शाळेतलं प्रेम, शाही लग्न, मग दोघांनी आयुष्य संपवलं; मृत्यूंमध्ये काही तासांचं अंतर, कारण काय?
पीएम आवास योजनेचा पहिला हफ्ता असलेली ४० हजारांची रक्कम बँक खात्यात येताच महिलांनी त्यांच्या पतीला सोडलं आणि प्रियकरांसोबत पळून गेल्या. योजनेच्या नियमांनुसार, एखाद्या लाभार्थ्यानं पीएम आवास योजनेतील पैशांचा वापर अन्यत्र केल्यास त्याच्याकडून शासन पैशांची वसुली करु शकतं. तसा अधिकार प्रशासनाला आहे. पहिला हफ्ता घेऊन फरार झालेल्या महिलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. प्रशासनानं त्यांच्याकडून पैसे वसुलीची प्रक्रिया सुरु केली आहे.

Source link

Narendra Modipm awas yojanapm awas yojana graminwomen runs with loversआवास योजनेचे पैसे घेऊन फरारआवास योजनेचे पैसे घेऊन महिला फरारपीएम आवास योजनापीएम आवास योजनेचा गैरवापर
Comments (0)
Add Comment