१२ जुलैला मंगळ आणि गुरुचा तब्बल १२ वर्षानंतर वृषभर राशीत संक्रमण होणार आहे. गुरु आधी वृषभ राशीत स्थित असल्याने हा संयोग जुळून येणार आहे. तर मंगळ ग्रह ४५ दिवस वृषभ राशीत राहिल. या काळात मंगळ आणि गुरुच्या संयोगाचा प्रभाव २६ ऑगस्टपर्यंत राहाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रह अग्नि तत्वाचा ग्रह मानला जातो. गुरु हा शुभ ग्रह असून पुढील ४५ दिवस ४ राशींसाठी अतिशय त्रासदायक ठरेल. या संक्रमणादरम्यान मंगळ आणि गुरु शनीच्या मध्यभागी बसले आहेत. मंगळाची दहावी दृष्टी शनीवर तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि मंगळामुळे विपरीत परिणाम होतील. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. गुरु-मंगळ या राशीच्या लोकांवर आर्थिक, कौटुंबिक, व्यवसाय आणि आरोग्यावर प्रभाव टाकेल. जाणून घेऊया कोणत्या चार राशींना मंगळ-गुरु युती त्रासदायक ठरेल
वृषभ – प्रवास जपून करा
वृषभ राशीत मंगळ पहिल्या घरात असणार आहे. या काळात तुम्हाला प्रवासात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परंतु, प्रगती मिळेल. मंगळाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर अधिकचे पैसे खर्च करावे लागतील. पार्टनरशीपच्या कामात तुम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागले. परंतु, हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल.
मिथुन – सावधगिरी बाळगा
मिथुन राशीत मंगळ बाराव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्य क्षेत्रात काम करणारे, परदेशात काम करणारे आणि व्यवसाय करणाऱ्यांना कामातून काही प्रमाणात आराम मिळेल. तुमच्या समस्यांचे सोडवण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. कामात अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. तसेच तुमच्या खर्चातही वाढ होईल. कुटुंबासोबतच्या नात्यात वाद निर्माण होतील.
तुळ – आर्थिक चणचण भासेल
तुळ राशीत मंगळ आठव्या घरात असणार आहे. या वेळी तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक परिस्थिती कमकुवत राहिल. कोणाशीही पैशांचे व्यवहार करणे टाळा. उधारीवर दिलेले पैसे अडकू शकतात. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
कुंभ – करिअरमध्ये ताण वाढेल
कुंभ राशीत मंगळाचे संक्रमण चौथ्या घरात होईल. यावर शनिची दृष्टीही असणार आहे. त्यामुळे जोखीम घेणे टाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. तुम्हाला इजा होण्याची शक्यता अधिक आहे. करिअरमध्ये तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्चात अचानक वाढ होईल.