आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात पाहायला मिळते ती लवंग. पदार्थाची चव वाढवण्यापासून ते आरोग्यासाठी लवंग बहुगुणी ठरते. परंतु, लवंगाचा जितका वापर स्वयंपाकघरात केला जातो तितकाच अनेक ज्योतिषाशास्त्रातील उपायावर.
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, लवंगाचे काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. तसेच आर्थिक लाभ होऊन नकारात्मकता दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर आहे. जाणून घेऊया काही सोपे उपाय
कामात अडचणी होतील दूर
तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती स्थापित करा. यानंतर लवंग आणि सुपारी अर्पण करा. कामासाठी बाहेर जात असाल तर तुमच्या पॉकेटमध्ये श्रीगणेशाला अर्पण केलेली सुपारी आणि लवंग घ्या. असे केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील.
आर्थिक लाभ होण्याची शक्यता
देशी तुपाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानासमोर हा दिवा नियमितपणे लावा. असे केल्याने शत्रूचा नाश होतो. आर्थिक लाभासाठी या दिव्याने पूजा करावी. यामुळे धनलाभ होईल.
कुटुंबात शांतता टिकवून ठेवण्यासाठी
कुटुंबात सतत वाद होत असतील तर लवंगाचा उपाय फायदेशीर ठरेल. यासाठी ५ लवंगा, ३ कापूर आणि ३ मोठी वेलची घेऊन शनिवारी जाळा. या जळलेल्या वस्तूंचा धुर घरातील प्रत्येक खोल्यांमध्ये नेऊन फिरवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच कुटुंबातील मतभेद दूर होतात.
अडकलेला पैसा मिळेल
जर तुमचे पैसे अडकले असतील तर पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री ११ किंवा २१ लवंगा कापूरने जाळून टाका. यानंतर देवी लक्ष्मीच्या स्त्रोताचे पठण करा. असे केल्याने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता वाढते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.