Pm Modi Russia Visit : सिर पर लाल टोपी ‘रूसी’..भारतीयांना संबोधित करताना मोदींनी गायलं ‘हिंदी’ गाणं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार (8 जुलै) रोजी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असून ते दोन दिवस मॉस्कोमध्ये राहणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी मोदींना मारली मिठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर स्वागत केलं. पंतप्रधान मोदी हे आपल्या कार मधून उतरताच पुतिन यांनी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली.

PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर, पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी? नेमकं काय आहे कारण?

मोदींनी गायलं हिंदी गाणं

पंतप्रधान मोदी यांनी आज रशियाची राजधानी मॉस्को येथे भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी ‘आवारा’ चित्रपटातील फिर भी दिल है हिंदुस्थानी… या गाण्यातील ‘सिर पर लाल टोपी रूसी…’ही ओळ म्हंटली. त्यानंतर भारतीयांनी ”फिर भी दिल है हिंदुस्थानी…” असं म्हणत गाण्याला दाद दिली.

भारत बदलतोय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील भारतीयांना संबोधित करताना 10 वर्षात भारताने केलेल्या प्रगतीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ” मागील 10 वर्षापासून भारताने विकासाची जी गती पकडली आहे. ते पाहून जग चकित झाले आहे. जगभरातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा ते म्हणतात की, भारत बदलत आहे. भारताने जेव्हा जी 20 परिषदेचं यशस्वीरित्या आयोजन केलं. तेव्हा इतर देशांचे लोक म्हणायचे भारत बदलत आहे. भारताने 10 वर्षांत 40 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले आहे.आज भारत डिजिटल पेमेंटचे नवनवीन रेकॉर्ड बनवतोय. भारताने जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बनवला आहे. 140 कोटी जनतेच्या पाठबळाने आज भारत बदलत आहे”.

रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका काय ?

रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झाले. सर्वप्रथम रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामागे जमिनीचे दावे, राजकीय आणि लष्करी रणनीती या कारणांचा समावेश होता. परंतु रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका संतुलित राहिली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धासाठी भारताने अद्यापही रशियाला जबाबदार धरलेले असून भारताने तटस्थता राखली आहे. तर दोन्ही देशांनी संवादातून तोडगा काढावा असा सल्ला भारताने दिलेला आहे.

Source link

india and russiaNarendra Modi TOPICpm modi newspm modi russia visitPm Modi RussiaVisit newsपंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदी भावुकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा
Comments (0)
Add Comment