PM Modi Russia Visit : सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मिठी मारली, मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार (8 जुलै) रोजी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असून ते दोन दिवस मॉस्कोमध्ये राहणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींनी गुन्हेगाराला मिठी मारली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर स्वागत केलं. पंतप्रधान मोदी हे आपल्या कार मधून उतरताच पुतिन यांनी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, ”हा अत्यंत निराशाजनक आणि शांततेच्या प्रयत्नांना मारक ठरणारा प्रसंग आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या प्रमुखाने मॉस्कोमध्ये जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला आलिंगन दिले आहे.”
Pm Modi Russia Visit : सिर पर लाल टोपी ‘रूसी’..भारतीयांना संबोधित करताना मोदींनी गायलं ‘हिंदी’ गाणं

मोदी-पुतिन भेटीमुळे अमेरिकेने चिंता केली व्यक्त

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत रशिया संबंधांवर चिंता व्यक्त केली आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक टिप्पण्या पाहत आहोत. ते काय बोलले ते आम्ही पाहत आहोत. पण आम्ही म्हटल्याप्रमाणे, आम्ही भारताला त्यांच्या रशियासोबतच्या संबंधांबद्दलच्या चिंता सांगितल्या आहेत.”

रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका काय ?

रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झाले. सर्वप्रथम रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामागे जमिनीचे दावे, राजकीय आणि लष्करी रणनीती या कारणांचा समावेश होता. परंतु रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका संतुलित राहिली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धासाठी भारताने अद्यापही रशियाला जबाबदार धरलेले असून भारताने तटस्थता राखली आहे. तर दोन्ही देशांनी संवादातून तोडगा काढावा असा सल्ला भारताने दिलेला आहे.

Source link

Narendra Modi TOPICpm modi russia visitPM Modi Russia Visit newsrussia ukraine crisisrussia ukraine warvolodymyr zelenskyvolodymyr zelensky on modiपंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरारशिया-युक्रेन युद्ध
Comments (0)
Add Comment