PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने केलं सन्मानित

मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार (8 जुलै) पासून दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. अशातच आज (9 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आणि दोन्ही देशांच्या विकासामध्ये योगदान दिल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.

2019 मध्येच पुरस्काराची घोषणा झाली होती

दरम्यान, 2019 मध्ये भारतातील रशियाचे राजदूत यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. रशियातील नागरिक आणि सैनिकांना‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने सन्मानित येते. आता हा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. भारत आणि रशियातील लोकांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

PM Modi Russia Visit : सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मिठी मारली, मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीका

रशिया युक्रेन युद्धावर मोदी काय म्हणाले ?

रशिया युक्रेन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ” आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता राखणे गरजेचे आहे. शांतता कायम राखण्यास भारत मदत करण्यास तयार आहे. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने आहे. भारत गेल्या 50 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. जेव्हा मॉस्कोमध्ये दहशतवादी घटना घडल्या तेव्हा काय वेदना झाल्या असतील या मी नक्कीच समजू शकतो.”

मोदी-पुतीन भेटीमुळे झेलेन्स्की नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर स्वागत केलं. पंतप्रधान मोदी हे आपल्या कार मधून उतरताच पुतिन यांनी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, ”हा अत्यंत निराशाजनक आणि शांततेच्या प्रयत्नांना मारक ठरणारा प्रसंग आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या प्रमुखाने मॉस्कोमध्ये जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला आलिंगन दिले आहे.” असं म्हणत
झेलेन्स्की यांनी जोरदार टीका केली आहे.

Source link

Narendra Modi TOPICpm modi newspm modi russia visitpm modi russias highest civilian awardrussias highest civilian award newsऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टलनरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरीक पुरस्कारपंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरा
Comments (0)
Add Comment