एरंडोलकरांनो सावधान…! तीन महीन्यांच्या ब्रेक नंतर एकाच कुटुंबात आढळुन आले ‘कोरोना, चे तीन नवे रुग्ण..!

एरंडोल:तालुक्यात जुलै २०२१ पासून एकही कोरोना चा रूग्ण आढळुन आलेला नव्हता त्यामुळे कोरोना ची गच्छंती झाली असे मानण्यात येत होते, माञ एरंडोल येथे एकाच कुटुंबातील ३जण( १महीला व२ मुले ) ‘कोरोना, चे रूग्ण आढळुन आल्यामुळे खळबळ माजली आहे.
या घटनेमुळे कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे असे दिसून येते..विशेष हे की, दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये एरंडोल शहरात कोरोनाचे पुनरागमन झाले आहे ही दुर्दैवी बाब आहे.
एरंडोल येथील प्रणव नगरातील एकाच कुटुंबातील ४०वर्षीय महीला,१७वर्षीय मुलगा,१३वर्षीय मुलगा व कुटुंबप्रमुख या चार जणांना आठवडाभरापासून ञास जाणवत होता म्हणून त्यांनी एरंडोल येथील एका खाजगी डॉक्टर कडे उपचार घेतले, उपचाराअंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे कोरोना ची चाचणी करण्याचे त्यांना सूचित करण्यात आले म्हणून शनीवारी दुपारी चौघांची एरंडोल ग्रामीण रूग्णालयात तपासणी करण्यात आली असता ४०वर्षीय महीला,१७वर्षीय मुलगा व १३वर्षीय मुलगा असे तीघेजण पॉजिटीव्ह असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांना जळगाव (मोहाडी) येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.
या कुटुंबाच्या प्रमुखांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्यामुळे त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला.
आठ दिवसांपुर्वीच या कुटुंबातील १७वर्षीय मुलगा मुंबई ला जाऊन आला होता, प्रथम त्याला ञास जाणवू लागला, त्यानंतर त्याची आई व लहान भावाला सूध्दा संसर्गामुळे लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान एरंडोल नगरपालिका प्रशासन व नागरीक यांनी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे.
कोरोना रूपी रावण ‘एकचक्रनगरीत, पुन्हा अवतरल्यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. पुन्हा एकदा मास्क व सँनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन,गर्दी टाळणे यासारख्या कोरोना नियमावली पाळण्याची नागरीकांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपलि आहे, पुन्हा पूर्वीची दिड वर्षांपूर्वीची स्थिती,सणासुदीच्या दिवसांत निर्माण होऊ नये अशी अपेक्षा आहे.

Comments (0)
Add Comment