स्वयंचलित कारची पादचाऱ्याला धडक, चूक कुणाची? सोशल मीडिया विभागला, AI च्या मर्यादांवरही प्रश्न

बीजिंग : जगभरात सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर होत आहे. वाहन चालविण्याचेही कसब ‘एआय’ने आत्मसात केले आहे. चीनमध्ये एआय आधारित एका विनाचालक कारने पादचाऱ्याला धडक दिली. पादचारी किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात चूक कोणाची यावर सोशल मीडियावर चर्चा झडल्या. यात पादचाऱ्याची चूक असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. मात्र, मानवी वर्तणुकीचा अंदाज घेण्यास ‘एआय’ला मर्यादा असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

चीनच्या वुहान शहरात एका स्वयंचलित वाहनाने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली. ‘सिग्नलवर वाहने थांबलेली असताना हिरवा दिवा लागला आणि पादचाऱ्याशी किरकोळ संपर्क झाला,’ असे बैडू या ‘एआय’ तंत्रज्ञान आधारित वाहननिर्माता कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘संबंधित व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, जेथे तपासणीत कोणतीही स्पष्ट बाह्य जखम आढळली नाही,’ असे ‘बैडू’ने म्हटले आहे.
Mount Everest: माउंट एव्हरेस्टवर गोठला कचरा; ११ टन कचरा उचलला, सोबत सापडले मृतदेह अन् सांगाडा

या अपघाताचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. छतावर सेन्सर असलेल्या एका कारच्या समोर एक व्यक्ती बसलेली आहे, असे दिसत आहे. यावरून पादचाऱ्याने कायदा मोडल्याचे निदर्शनास आणून देत लोकांनी ‘बैडू’चे समर्थन केले आहे, असे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या शांघाय डेली वृत्तपत्राने ‘एक्स’वर पोस्टमध्ये म्हटले आहे.

वुहानमधील घटनेने स्वयंचलित वाहनांना जटील परिस्थितीत तोंड द्यावे लागणार असल्याचे अधोरेखित केले आहे, असे चीनमधील आर्थिक वृत्तसंस्था ‘यिकाई’ने म्हटले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने किंवा पादचाऱ्यांच्या वर्तनाला सामोरे जाताना तंत्रज्ञानालाही मर्यादा येऊ शकतात, असे ‘यिकाई’ने एका तज्ज्ञाचा हवाला देत सांगितले.
US Recession: पुन्हा मंदीचे काळे ढग! अमेरिका मंदीच्या कचाट्यात, जगभरातील देशांना रेड अलर्ट, मिळू लागले संकेत

कोण आहे बैडू?

मूळ बीजिंगमध्ये असलेली ‘एआय’वर आधारित असलेली स्वयंचलित वाहन निर्मितीतील बैडू ही आघाडीवरील कंपनी आहे. मध्य चीनमधील वुहान येथे तीनशे मोटारींच्या ताफ्यासह त्यांची सर्वात मोठे ‘रोबोटॅक्सी’ कार्यशाळा आहे. त्यांचे ‘अपोलो गो’ हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म चीनच्या बीजिंग, शेनझेन आणि चोंगकिंग या शहरांत कार्यरत आहेत. विनाचालक टॅक्सीच्या सहाव्या पिढीचे कंपनीकडून मे महिन्यात अनावरण करण्यात आले. या एका वाहनाची किंमत निम्म्याहून कमी करून ३० हजार अमेरिकी डॉलरच्याही खाली कंपनीने आणली आहे.

Source link

ai based carbaidu carschina newsdriverless car accidentdriverless car in chinaएआय विनाचालक कारचीनमधील एआय कारबीजिंगमधील बैडू कंपनीस्वयंचलित कार अपघात चीनस्वयंचलित कारची पादचाऱ्याला धडक
Comments (0)
Add Comment