महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
शेतीची औजारे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,माहागाव येथील गुन्हा केला उघड…
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०३) रोजी पोलिस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम हिवरा संगम शेतशिवारातील शेती अवजारे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेली होती सदर प्रकरणी फिर्यादी यांनी पोलिस ठाणे महागांव येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक ४६३ / २०२४ कलम ३०३ (२) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरु होता.
त्याअनुषंगाने दि ०८/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिखाल्ली गोपनीय माहिती व तांत्रीक बाबींचे आधारे आरोपी १) शेख मुजीब शेख हजमा वय ३८ वर्षे, २)स्वप्नील गोविंदराव गायकवाड वय २५ वर्षे, ३) ऋषिकेश संतोष राजवाडे वय २२ वर्षे, सर्व रा. हिवरा संगम यांना निष्पन्न केले व ताब्यात घेवुन चौकशी केली असता नमुद आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेली शेतीची अवजारे, व गुन्हयात वापरलेले एक ट्रॅक्टर तसेच एक चोरीची मोटर सायकल असा एकुन ५,००,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी १) शेख मुजीब शेख हजमा वय ३८ वर्षे, २) स्वप्नील गोविंदराव गायकवाड वय २५ वर्षे, ३) ऋषिकेश संतोष राजवाडे वय २२ वर्षे, सर्व रा. हिवरा संगम यांना पुढील
तपासकामी पोलिस ठाणे महागांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप,पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे,पोलिस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.