स्थानिक प्रशासनाच्यामते रस्ता पूर्ववत होण्यासाठी फार काळ लागू शकतो,अशात यात्रेकरुना जागीच थांबण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. मंगळवारी सकाळीच ७ वाजता जोशीमठ चुंगी इथला डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि थेट बद्रीनाथ राष्ट्रीय राजमार्गवर पडला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. यामुळे रस्त्याचा अर्धा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटला आहे, काल सकाळपासून सीमा रस्ते संघटन आणि स्थानिक प्रशासन ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
जोशीमठ आणि गुरुद्वारामध्ये बद्रीनाथ यात्रेला आलेल्या काही भाविकांना थांबवण्यात आले आहे.जोशीमठ नजीकचा रस्ता बंद झाल्याने काही नागरिक आपला जीव धोक्यात घालत जोगी धारावरुन इंदिरा पॉइट पर्यंत पायी चालत पोहचलेत. दिल्लीस्थित संदीप अवस्थी आणि पूनम अवस्थी यांनी माहिती दिली काल दुपारी ३ ची हरीद्वारवरुन त्यांची ट्रेन होती, पण रस्ता बंद असल्याने ते अडकून पडले आणि त्यांची ट्रेनसुद्धा गेली.
उत्तराखंडमध्ये आज मतदान सुद्धा आहे, काल जोशीमठ पर्यंत पोलींग पक्ष पायी चालत पोहचले, रस्त्यावर पडलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्यामुळे सर्व मतदान बूथवर पोलींग अधिकारी सुद्धा पायी चालत पोहचले आहेत.