यावर कंपनीने आपण टीव्हीवरुन १४ उत्पादनांच्या जाहिराती हटवल्या आहेत असे सांगितले पण सोशल मीडियावरील जाहिरातीचे काय असा सवाल कोर्टाने पतंजली कंपनीला विचारला, यावर पतंजलीच्या वकीलाने आम्ही संबधित सर्व जाहिराती विभागांना सूचना दिली अशी कोर्टात माहिती दिली. यानंतर कोर्टाने वकिलाचा युक्तीवाद फेटाळत कोर्टाने पतंजली कंपनीला दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे, यामध्ये कंपनीला एक अधिकृत प्रतिज्ञाप्रत करुन कोर्टात सादर करायचे आहे ज्यामध्ये सोशल मीडियावरील सर्व जाहिराती हटवल्या गेल्या आहेत यासह टीव्हीवरील सर्व जाहिराती काढून टाकल्या आहेत याची माहिती सादर करायची आहे, तसेच पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.
इंडिया मेडिकल असोसिएशन यांच्याद्वारा दाखल केलेल्या याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. यामध्ये इंडिया मेडिकल असोसिएशनने लसीकरण अभियान आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीला बाबा रामदेव यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. उत्तराखंड सरकारने सांगितले की पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मेसीच्या १४ उत्पादकांवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने खोट्या जाहिरात प्रकरणी योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांना माफी मागण्यास सांगितले होते तसेच पतंजलीवर अवमान नोटीसाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.