Samsung Galaxy Ring: सॅमसंगच्या नवीन स्मार्ट रिंगमध्ये मिळेल 7 दिवसांची बॅटरी लाईफ, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Samsung Galaxy Ring: सॅमसंग गॅलेक्सी रिंग अखेर लॉन्च झाली आहे. सॅमसंगची ही स्मार्ट रिंग कंपनीने यावर्षी आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केली होती. या रिंगमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले. या डिवाइसमध्ये काय असेल खास जाणून घेऊया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये आपली स्मार्ट रिंग लॉन्च केली आहे. सॅमसंगने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 मध्ये ही रिंग लाँच केली होती. कंपनीने त्यावेळी याची किंमत आणि फीचर्स जाहीर केले होते. कोरिअन कंपनीच्या या स्मार्ट रिंगमध्ये अनेक हेल्थ सेन्सर आहेत, ज्याद्वारे युजर्स त्यांची हेल्थ ट्रॅक करू शकतात.

दक्षिण कोरियाच्या कंपनीची ही गॅलेक्सी रिंग इतर ब्रँडच्या स्मार्ट रिंगपेक्षा महाग आहे. यामध्ये कंपनीने अनेक हेल्थ फीचर्स दिले आहेत ज्यात स्लीप मॉनिटरिंग, हार्ट रेट, स्नोरिंग ट्रॅकिंग, रेस्पिरेटरी ट्रॅकिंग, पीरियड्स ट्रॅकिंग इत्यादींचा समावेश आहे. सॅमसंगची रिंग 9 वेगवेगळ्या साइझेसमध्ये येते, जी युजर्स त्यांच्या बोटांच्या आकारानुसार खरेदी करू शकता.

गॅलेक्सी रिंग किंमत

Galaxy Ring ची किंमत $399 म्हणजेच अंदाजे 34,000 रुपये आहे. हे 10 जुलैपासून म्हणजे आजपासूनच निवडक बाजारपेठांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. त्याची विक्री 24 जुलैपासून सुरू होईल. ही स्मार्ट रिंग टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड कलर पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

गॅलेक्सी रिंगमध्ये काय खास आहे?

सॅमसंगची ही स्मार्ट रिंग 5 ते 13 या आकारात आहे. यात 8MB स्टोरेज आहे. याशिवाय, यात पीपीजी म्हणजेच फोटोप्लेथिस्मोग्राफी सेन्सर प्रदान करण्यात आला आहे, जो युजर्सचे हार्ट रेट ट्रॅक करतो. याशिवाय यात टेम्परेचर सेन्सर आणि एक्सेलेरोमीटर सेन्सरही उपलब्ध असतील. सॅमसंगच्या हेल्थ ॲपद्वारे ही रिंग ॲक्सेस केली जाऊ शकते.

सॅमसंगने आपल्या स्मार्टफोन्सप्रमाणेच वेअरेबल डिवाइसेसमध्येही एआय फीचर प्रदान केले आहे. ही स्मार्ट रिंग गॅलेक्सी एआय टच फीचरला सपोर्ट करते. याशिवाय एनर्जी स्कोअर आणि वेलनेस टिप्स यांसारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील.

Galaxy Ring मध्ये वर्कआउट डिटेक्शन, पॅसिव्ह अलर्ट सारखे दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या स्मार्ट रिंगला IP68 रेटिंग आहे, ज्यामुळे पाण्यात बुडवूनही ते खराब होणार नाही. यात 10 एटीएम वॉटर रेसिस्टंट फीचर आहे. यामध्ये टायटॅनियम ग्रेड 5 मटेरियल वापरण्यात आले आहे.

गॅलेक्सी रिंगची बॅटरी लाईफ

ही रिंग ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी फीचरला सपोर्ट करते. यात 1.5GB स्टोरेज आहे. मोठ्या आकाराच्या रिंगमध्ये 23.5mAh बॅटरी असेल. सॅमसंगची ही अंगठी 18mAh बॅटरीसह येते. ते चार्ज करण्यासाठी, 361mAh बॅटरीसह चार्जिंग केस उपलब्ध आहे. या रिंगची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 7 दिवस चालेल असा कंपनीचा दावा आहे.

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

battery lifeSnoring trackingगॅलेक्सी एआय टचपीरियड्स ट्रॅकिंगसॅमसंग इव्हेंट
Comments (0)
Add Comment