एरंडोल तालुक्यात जिल्हापरीषद शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्यांपासुन मुख्याध्यापकांपर्यंत सर्वञ ‘प्रभारी राज, चाच बोलबाला..!

एरंडोल: तालुक्यातील जिल्हापरीषद शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक ही महत्वाची दोन्ही पदे अनुक्रमे ५व३ वर्षांपासून रिक्त असून या दोन्ही पदांवर ‘प्रभारी राज, सूरू आहे.
विशेष हे की, या दोन्ही पदांचा कार्यभार एकाच अधिकार्याकडे सोपविण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून जि.प.प्राथमिक शाळांची पटसंख्या कमालिची रोडावली आहे त्यामूळे या शाळांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रशासन व शासनाकडून विशेष उपाययोजना राबविणे गरजेचे असताना प्रत्यक्षात या विभागाकडे जिल्हापरीषदेकडून कानाडोळा केला जात आहे अशी शिक्षणप्रेमी नागरीकांची तक्रार आहे.
एरंडोल तालुक्यात केंद्रप्रमुख पदाच्या ७ मंजुर जागांपैकी ६ पदे रिक्त आहेत, थोडक्यात एकच केंद्रप्रमुख कार्यरत आहे,शाळेचे कामकाज पाहणार्या मुख्याध्यापक पदाच्या २९ जागांपैकी एकविस जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत, पदविधर शिक्षकांच्या १३ जागा रिक्त आहेत,
सहा महीन्यांपासुन उपशिक्षकाच्या २१जागा रिक्त आहेत,गणित व विज्ञान या महत्वाच्या विषयांच्या शिक्षकांची ११पदे रिक्त आहेत.
एरंडोल तालुक्यात जि.प.प्राथमिक शाळांची संख्या ८४असून जवळपास ११हजार विद्यार्थी इयत्ता १ली ते ७वी च्या वर्गांत शिक्षण घेत आहेत.
तालुक्यात शिक्षण विभागात एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने सर्वञ प्रभारी राज चाच बोलबाला आहे. अश्या गंभीर स्थितीत जिल्हा परीषद शाळांमध्ये शैक्षणीक गुणवत्ता कशी वाढणार,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होणार असे प्रश्न पालकांना भेडसावत आहेत.
पालक व विद्यार्थी यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण असण्याचे मोठे आव्हान जि.प.च्या शाळांपुढे उभे ठाकले आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हापरीषदेने युध्दपातळीवरून गटशिक्षणाधिकारी या जबाबदारी च्या प्रमुख पदासह इतर सर्व रिक्त पदे भरावित अशी मागणी जोर धरत आहे.

Comments (0)
Add Comment