Crossbow Attack: लंडनमध्ये तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ; BBC पत्रकाराच्या पत्नीसह दोघा मुलींना क्रॉसबोचा वापर करून केले ठार

लंडन: इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये मंगळवारी संध्याकाळी तिघा महिलांची धनुष्यासारखे शस्त्र असलेल्या क्रॉसबोने हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या महिला या बीसीसी पत्रकारची पत्नी आणि दोन मुली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केले असून काइल क्लिफोर्ड नावाच्या २६ वर्षीय व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती राजधानीच्या शेजारी असलेल्या काउंटी हार्टफोर्डशायर येथे असू शकते. मंगळवारी संध्याकाळी या महिलांवर हल्ला झाला ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

इंग्लंड पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, लंडन शहरात बीसीसीचे रेसिंग समालोचक जॉन हंट यांची पत्नी कॅरोल हंट आणि दोन मुलींची हत्या करण्यात आले.त्यांचे वय अनुक्रमे ६१, २५ आणि २८ असे आहे. हा एक ‘टार्गेटेड किलिंग’चा प्रकार असल्याचे पोलीस म्हणाले. याासठी क्रॉसबोचा वापर करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बुधवारी पोलिसांनी सांगितले की, यासाठी अन्य शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या प्रकरणी पोलीस काइल क्लिफोर्ड या व्यक्तीचा शोध घेत आहेत. नागरिकांनी त्याच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
Female Police Trainee: मी आत्महत्या करतोय,आईला सांगू नका; इंदापूरच्या महिला पोलिस प्रशिक्षणार्थ्याने का घेतला टोकाचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

इंग्लंडचे गृह मंत्री यवेट कूपर म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. बुशई येथे काल रात्री तीन महिलांवर झालेला हल्ला धक्कादायक होता. या महिलांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी माझ्या संवेदना व्यक्त करतो. त्याच बरोबर नागरिकांनी या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर ही हार्टफोर्डशायर पोलिसांना द्यावी.
HIV Positive Student: भारतातील या राज्यात पसरतोय ‘एड्स ड्रग्ज’; शाळा-कॉलेजमधील ८२८ जणांना झाली बाधा, आतापर्यंत इतक्या जणांचा मृत्यू

पीए मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ज्या महिलांची हत्या झाली त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले की, आम्ही प्रत्येक दिवशी एकमेकांना भेटायचो. जे काही झाले आहे ते खरच फार धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या संदर्भात अधिक चौकशी करत आहेत.

Source link

Bbc Journalist Wife And Two Daughters Killedbbc radio commentator family killedcrossbowCrossbow Attack in Londonuk policeबीबीसी पत्रकाराच्या कुटुंबाची हत्यालंडनलंडनमध्ये तिहेरी हत्याकांड
Comments (0)
Add Comment