आज आम्ही अशा ४ राशींबद्दल बोलणार आहोत, ज्यांना सूर्याच्या राशिपरिवर्तनामुळे चढउताराचा सामना करावा लागणार आहे. या राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनांत अडचणींना तोंड द्यावे लागू शकते आणि होत आलेली कामेही रखडतील. तर जाणून घेऊन कर्क राशीत सूर्याने संक्रमण केल्यामुळे कोणत्या राशींना सांभाळून राहावे लागेल.
सूर्य संक्रमणाचा कर्क राशीवर प्रभाव
सूर्य तुमच्या राशीत लग्न भावात अर्थात पहिल्या स्थानी संक्रमण करत आहे. या काळात तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव राहील, ज्याच्यामुळे तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. नोकरदारांना कार्यक्षेत्रात अधिकारी किंवा सहकारी यांच्यामुळे समस्या निर्माण होतील, त्यामुळे तुम्ही नवी नोकरी शोधण्याचा विचार कराल. वडिलांसोबत तुमच्या संबंधात चढउताराची स्थिती राहील, त्यामुळे घरातील वातावरण खराब होईल. या काळात प्रकृतीसंबंधित समस्यांना सामना करावा लागू शकते. कामाच्या वाढत्या दबावामुळे मानसिक तणाव वाढेल.
सूर्य संक्रमणाचा कन्या राशीवर प्रभाव
सूर्य तुमच्या राशीत ११व्या स्थानी संक्रमण करत आहे. या काळात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. या काळात कार्यक्षेत्रात सावध राहण्याचा सल्ला तुम्हाला राहील. अनावश्यक गप्पागोष्टींपासून दूर राहा. भावनेच्या भरात काहीही बोलणे टाळा, कारण समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामुळे वाईट वाटू शकते. व्यापाऱ्यांना एखाद्या ग्राहकामुळे किंवा इतर व्यापाऱ्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दिसते, त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
सूर्य संक्रमणाचा धनू राशीवर प्रभाव
सूर्य तुमच्या राशीला आठव्या स्थानी संक्रमण करत आहे. या काळात प्रेमजीवनात चढउतारांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमची फार धावपळ होईल. या काळात तुमच्या समोर नवनवीन खर्च येतील, जे मनात नसतानाही तुम्हाला करावे लागतील. संक्रमण काळात पैशांची देवाणघेवाण करू नका, कारण पैसे थकण्याची शक्यता आहे. तुम्ही जर नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करावी. संक्रमण काळात वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जास्त लक्ष देण्याची गरज पडेल. मित्रांना कोणतीही गुप्त गोष्ट सांगू नका, अन्यथा मानहानीची शक्यता आहे.
सूर्य संक्रमणाचा कुंभ राशीवर प्रभाव
सूर्य तुमच्या राशीत सहाव्या स्थानी संक्रमण करत आहे. या काळात तुमच्या कामात अडथळी येऊ शकतात. तसेत भावाबहिणींसोबत काही विषयांवरून गैरसमज होतील. व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाल्याने निराशेला तोंड द्यावे लागेल. नोकरदार लोकांनी वादविवादापासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीची चिंता सतावेल, तसेच धावपळही होईल. या काळात कोठे प्रवासाला जात असाल तर सामानाची पूर्ण काळजी घ्या, चोरी होण्याची शक्यता आहे.