अशोक जेठाभाई धुनवा (४२ वर्षे), लिलूबेन अशोकभाई धुनवा (४२ वर्षे), जिग्नेश अशोकभाई धुनवा (२० वर्षे) आणि किंजलबेन अशोकभाई धुनवा (१८ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. चौघांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. त्यांच्या मृतदेहांजवळ पोलिसांना विषारी द्रव्य आढळून आलं आहे. धारागर गावाजवळच्या शेतात त्यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
धुनवा कुटुंब जामनगरात वास्तव्यास होतं. तिथून ७० किलोमीटर दूरवर कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले. पोलिसांना मृतदेहांजवळ दुचाकी उभी असलेली दिसली. धुवा कुटुंबांनी आत्महत्या केल्याची बातमी जामनगरात समजताच त्यांचा शेजार शोकसागरात बुडाला. धुवा कुटुंब असं काही पाऊल उचलले अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
जामनगरच्या माधनभागमध्ये धुनवा कुटुंबा राहायचं. अशोक धुनवा यांचा ब्रासच्या भांड्यांचा व्यवसाय होता. कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. धुनवा कुटुंबानं घरापासून ७० किलोमीटर दूर जाऊन आयुष्य का संपवलं याचा शोध पोलीस घेत आहेत. सामूहिक आत्महत्येमागचं गूढ कायम आहे. गूढ उकलण्याचं काम पोलीस करत आहेत.
चौघांच्या आत्महत्येबद्दल समजताच नातेवाईक आणि मित्र परिवारानं रुग्णालयात धाव घेतली. जामनगरच्या गुरु गोविंदसिंह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर चौघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चौघांच्या आत्महत्येमुळे नातेवाईकांना एकच धक्का बसला आहे. त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. चौघांनी आत्महत्या का केली, कुटुंबात वाद होता का, आर्थिक अडचण होती का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.