भारताने जगाला ‘युद्ध’ नाही तर ‘बुद्ध’ दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकांना संबोधित करत असताना जगातील अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थितीवर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ” भारताने जगाला ‘युद्ध’ नाही तर ‘बुद्ध’ आहे. याचा अर्थ भारताने नेहमीच जगाला शांतता आणि समृद्धी दिली आहे. आणि म्हणूनच एकविसाव्या शतकात आपला देश भूमिका आणखी मजबूत करणार आहे.
हा माझा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असून त्यांनी भारत आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशातील मैत्रीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, ” माझा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा आहे. ही दीर्घ प्रतीक्षा एका ऐतिहासिक प्रसंगी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या मैत्रीची ७५ वर्षे साजरी करत आहेत. भौगोलिकदृष्ट्या दोन्ही देश दोन वेगवेगळ्या टोकांवर आहेत. पण आमच्यात अनेक साम्य आहेत. दोन्ही देश लोकशाहीला जोडण्याचे काम करतात.”
भारताची निवडणूक यंत्रणा ही लोकशाहीची ताकद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ” भारतातील 65 कोटी लोकांनी त्यांच्या मताच्या शक्तीचा वापर केला आहे. एवढी मोठी निवडणूक असतानाही काही तासांतच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ही निवडणूक यंत्रणा आणि लोकशाहीची ताकद आहे. लोकांनी आम्हाला तिसऱ्या टर्मसाठी जनादेश दिला आहे.”
भारत 2047 पर्यंत विकसित देश होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,”भारत लवकरच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तसेच 2047 पर्यंत भारत ‘विकसित देश’ होईल याचा आम्हाला विश्वास आहे. 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र म्हणून आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल.”