IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पाषाण रोड येथील निव

पुणे,दि.११:- आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात पुणे शहर पोलिसांची कारवाई .

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांचे पथक आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी कारवाईसाठी दाखल झाले आहे. पूजा खेडकर यांच्या खासगी कारवर बेकायदेशीरपणे लाल दिवा लावल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. पुणे शहर पोलिसांचे पथक पाषाण रोड येथील पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पण पूजा खेडकर यांच्या बंगल्याचा गेट बंद होता. तो उघण्यात आला नाही. त्याचसोबत त्यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी केली आहे.

खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. आता हा वाद त्याच्याही पुढे गेला आहे. हा वाद आता पूजा खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचला आहे. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा खेडकर यांचे पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाषाण रोड येथील नॅशनल सोसायटीमध्ये आलिशान बंगला आहे. त्यांच्या ⁠बंगल्याचा आवारात अनेक आलिशान कार आहेत. बंगल्याच्या आवारात मर्सिडीज बेंज, पजेरो आणि वादग्रस्त ठरलेली ऑडी कार देखील उभी आहे. पूजा खेडकर यांनी स्वत:च्या ऑडी बेकायदेशीरपणे लाल दिवा लावला आहे. याप्रकरणी त्यांची पुणे शहर पोलिस चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांनी या कारवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे. मोटर वाहन नियम या कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंडसुद्धा केला आहे.

Comments (0)
Add Comment