मागील ५ जूनला राष्ट्रपतींनी जुनी लोकसभा संसद खंडित केली होती, नवी लोकसभा अस्तित्वात आली. नियमांनुसार निवडणुक हारलेल्या खासदारांना सरकारी बंगला खाली करण्यासोबतच मंत्री पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. यानंतर निवडणुका जिंकून आलेल्या खासदारांना याच खाली बंगल्याचे वाटप केले जाते. मोदी सरकारमधील १७ केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला ज्यांना बंगला खाली करावा लागला आहे.
कोणा कोणाला मिळाली नोटीस
यामध्ये रावसाहेब दानवे, भारती पवार, आरके सिंह, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडेय, स्मृती इराणी, संजीव बलियान, राजीव चंद्रशेख, कैलास चौधरी, अजय मिश्रा टेनी, वी मुरलीधरण, निशिकांत प्रामाणिक, सुभाष सरकार, साध्वी निरंजन ज्योती, कौशल किशोर, भानुप्रताप वर्मा, कपिल पाटील, भागवत खुबा यांना पराभवानंतर बंगला खाली करण्याची नोटीस मिळाली होती.
स्मृती इराणींचा काँग्रेसकडून पराभव
स्मृती इराणी गेले दहा वर्ष बंगल्यात वास्तव्याला होत्या. मोदी सरकारमधील आक्रमक नेता म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्मृती इराणी यांना अमेठीतून मोठी हार पत्करावी लागली इतकेच नव्हे तर राहुल गांधींच्या विरोधात दोन वेळा स्मृती इराणी जिंकून येणाऱ्या सदस्य होत्या पण यंदा राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षातील उमेदवार किशोरलाल शर्मा यांनी एक लाखांहून अधिक मतांनी स्मृती इराणींचा पराभव केला. ११ जुलैला बंगला खाली करण्याची शेवटची तारीख होती अखेर आज स्मृती इराणी यांनी बंगल्याला निरोप दिला आहे.