Uttar Pradesh Lightning Strike : पावसाचा महातांडव! उत्तरप्रदेशात वीज पडल्यामुळे 38 जणांनी गमवला जीव

लखनौ : उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बुधवार ( 10 जुलै) रोजी लोकांच्या अंगावर वीज पडल्याची घटना घडली आहे. त्यात एकूण 38 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतापगडमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ सुलतानपूरमध्ये सात मृत्यू झाले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाले असून लोकांचे जनजीवन ठप्प झाले आहे.

10 ठिकाणी वीज पडल्याची घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशमधील 10 ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे. प्रतापगडमध्ये 11, सुलतानपूरमध्ये 7, चंदौलीमध्ये 6, मैनपुरीमध्ये 5, प्रयागराजमध्ये 4 तर औरैया, देवरिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येकी एक जणाने आपला जीव गमावला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

सुलतानपूरमध्ये एकूण सात जण मृत पावले आहेत, त्यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. एक महिला शेतात भाताची लागवड करत होती. तर काही मुले झाडाखाली खेळत होते. मुसळधार पावसाला सुरवात झाली म्हणून महिला झाडाखाली जाऊन उभी राहिली. परंतु अचानक वीज पडल्यामुळे महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झाला.

Smriti Irani : दहा वर्षानंतर स्मृती इराणींना सोडावे लागले घर, नावाची निघाली पाटी

हाथरसमध्ये एका भावाचा मृत्यू तर दूसरा भाजला

हाथरस जिल्ह्यात वीज पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्या भावाचे शरीर भाजले आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील जीटी रोडवर असलेल्या इक्बालपूर गावात शेतात काम करणाऱ्या दोन भावांवर वीज पडली, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत पावलेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसामध्ये उत्तर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

lightning strikeLightning Strike newsuttar pradeshUttar Pradesh Lightning StrikeUttar Pradesh News In Marathiउत्तर प्रदेशउत्तर प्रदेश बातमीउत्तर प्रदेश वीज प्रकरणन्यूज
Comments (0)
Add Comment