राजस्थान: जयपूर विमानतळावर एक घटना समोर आली आहे. एका महिला एअरलाइन कर्मचाऱ्याने सीआयएसएफ जवानाला थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. सीआयएसएफ जवानाने महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याने महिला कर्मचाऱ्यांवर थप्पड मारल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी त्या महिला कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. गुरुवारी (११ जुलै) सकाळी जयपूर विमानतळावर ही घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफच्या एएसआयला स्पाइसजेट एअरलाइन्सच्या महिला कर्मचारीनी थप्पड मारल्याचे समोर आले आहे. विमान कंपनीच्या फूड सुपरवायझर अनुराधा राणी या पहाटे चारच्या सुमारास वाहन गेटमधून अन्य कर्मचाऱ्यांसह विमानतळावर प्रवेश करत होत्या. कर्मचाऱ्याला तो गेट वापरण्याची परवानगी नसल्याने सहायक उपनिरीक्षक गिरीराज प्रसाद यांनी त्यांना थांबवले.
त्यानंतर त्यांना एअरलाइन कर्मचाऱ्यांसाठी प्रवेशद्वारावर तपासणी करण्यास सांगण्यात आले. पण सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी महिला सीआयएसएफ कर्मचारी नसल्याचे सांगितले. एएसआयने एका महिला सहकाऱ्याला सुरक्षा तपासणीसाठी बोलावले, परंतु यादरम्यान वाद वाढला. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्याने एएसआयला मारहाण केली.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१ (१) (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने दुखापत करणे) आणि १३२ (लोकसेवकावर प्राणघातक हल्ला) अन्वये अन्न पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले. . एएसआयच्या तक्रारीच्या आधारे अनुराधा राणीला अटक करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती एसएचओने दिली. यानंतर स्पाईसजेटनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आज जयपूर विमानतळावर एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये स्पाइसजेटची एक महिला सुरक्षा कर्मचारी सदस्य आणि एक पुरुष CISF कर्मचारी यांचा समावेश होता. स्टील गेटवर कॅटरिंग वाहन चालवत असताना आमच्या महिला सुरक्षा कर्मचारी सदस्य, ज्यांच्याकडे वैध विमानतळ प्रवेश पास होता. भारताच्या नागरी उड्डयन सुरक्षा नियामक ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने जारी केलेले, CISF कर्मचाऱ्यांनी अयोग्य आणि अस्वीकार्य भाषा केली. ज्यात तिला त्याच्या घरी त्याच्या ड्युटीच्या वेळेनंतर भेटायला सांगितले आहे. आपल्या महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक छळाच्या या गंभीर प्रकरणात कायदेशीर कारवाई केली आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तिला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.