बायको माधुरीसाठी सुरेशने पोलीसांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांसमोर न्यायासाठी भीक मागितली पण न्याय मिळाला नाही, पत्नी माधुरी पास होताच, पदभार स्विकारत नवऱ्याला सोडून गेली सुरेशने तिच्यासोबत फोनवर बोलुन परत येण्याची विनंती केली तेव्हा पत्नीने फोनवर आपले कधीच लग्न झाले नाही असे सांगत थेट नवऱ्यालाच खोटे पाडले. पिडीत नवरा झाशी शहरातील राहणारा आहे. दोन अडीच वर्षापूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता. सुरेशला तीन भाऊ आहेत ज्यामध्ये सुरेश सर्वांत धाकटा आहे.
माधुरीची ओळख सुरेशला एका मित्राने करुन दिली होती. अडीच वर्षापूर्वी दोघांनी पळून जावून मंदिरात लग्न केले आणि घरी आले दोघांचा विवाह सुरळीत सुरु होता, पण माधुरीने पुढे शिकण्याची इच्छा सुरेशला बोलून दाखवली, सुरेश मोल मजदूरी करत होता त्याने सुद्धा शिक्षणाला प्रोत्साहन देत मिळेल ते काम करत नोकरीला सुरुवात केली. पण जशी माधुरीने परीक्षा पास केली तिने नवऱ्याला सोडून टाकले आणि आपले लग्न झालेच नाही असा दावा केला.
पिडीत पतीने दावा केलाय की माधुरीला शिकवण्यासाठी मी काबाडकष्ट केले मी एक साधारण कारपेंटर आहे, तिला जी पुस्तके हवी होती ती दिली, ४०० ते ५०० दिवसाला कमावतो त्यातून तिला शिकवले, कर्ज घेवून शिक्षण दिले, आता जेव्हापासून तिने मला सोडले माझे जगणे कठीण झाले, मला तीची आठवण येते, माझ्याकडे जे लग्नाचे फोटो आणि कागदपत्रे आहेत त्याला तिने क्षणात खोटे ठरवले असा पतीने आरोप केला आहे.