Mangal Gochar 2024 In Marathi : Rashi Bhavishya In Marathi | वृषभ राशीत मंगळाचे संक्रमण! मिथुनसह ५ राशींवर ओढावणार संकट, आरोग्य जपा | Maharashtra Times

Mangal Sankraman 2024 In Marathi :
12 जुलै ला मंगळचे वृषभ राशीत गुरुसोबत संक्रमण होईल. ७ वाजून ३ मिनिटांनी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या या संक्रमणामुळे गुरु आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे.
मंगळ चौथ्या घरात आणि शनि दहाव्या घरात असल्याने देखील संयोग तयार होत आहे. मंगळाच्या संक्रमणामुळे बारा राशींवर संमिश्र परिणाम होणार आहे. मंगळाचे हे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते. ज्योतिषशास्रात मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो तर गुरु हा स्वभावाने सौम्य आणि शुभ मानला जातो. मंगळ-गुरुच्या युतीमुळे शुभ संयोग तयार होत आहे. या वेळी काही राशींवा व्यवसायात अचानक लाभ होईल. तर काहींना आर्थिक चणचण भासेल. मंगळाच्या संक्रमणाचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व १२ राशींवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया.

मेष राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मंगळ संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम मिळेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. कौटुंबिक मतभेदांमुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात कुणालाही उधारी देऊ नका. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. कोर्टाची कामे विचारपूर्वक करा. आरोग्याची काळजी घ्या

वृषभ राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

वृषभ राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणाचा प्रभाव सकारात्मक राहिल. लांबचा प्रवास घडू शकतो. नोकरी बदल किंवा बढतीची शक्यता आहे. व्यवसायातील महत्त्वपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी ही वेळ शुभ ठरेल. आर्थिक लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. आरोग्य कमकुवत होऊ शकते.

मिथुन राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मंगळाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. या काळात तुमची धांदल उडेल. खर्चाचा अधिक सामना करावा लागू शकतो. कर्जाचे व्यवहार या काळात करणे टाळा. व्यापारी वर्गाला परदेश प्रवासातून फायदा होईल. नवीन नोकरीसाठी हा काळ अनुकूल असेल. आरोग्याच्या समस्या त्रास देतील. वडिलोपार्जित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्याबाजूने असेल.

कर्क राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

कर्क राशीच्या लोकांना मंगळ संक्रमणामुळे चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित अडचणी संपतील. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. निवडणुकीशी संबंधित निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. मानसिक आजारामुळे तणाव वाढेल. ध्यान किंवा योगासन करा. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल.

सिंह राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण चांगले परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी वाद होतील. यशासाठी हा काळ चांगला राहिल. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. वाहन आणि घर खरेदीसाठी वेळ चांगला असेल. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील.

कन्‍या राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मंगळाच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांची अध्यात्म रुची वाढेल. व्यवसाय वाढवण्यासाठी परदेशी कंपन्यांकडून आर्थिक लाभ होईल. लव्ह-लाईफसाठी हा काळ चढ-उतारांचा असेल. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. ज्यामुळे तुम्हाला लाभ होतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. परीक्षेत चांगला निकाल मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

तुळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा प्रभाव चांगला नसणार आहे. आरोग्यावर परिणाम होईल. कौटुंबिक जीवनात वातावरण शांतता राहिल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात. घर किंवा वाहन घेण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. वैवाहिक जीवनात काही मुद्दयावरुन मतभेद होतील. जुने आजार उद्भवतील.

वृश्चिक राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचा प्रभाव चांगला असेल. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहिल. कामाच्या ठिकाणी कोणावर विश्वास ठेवू नका. मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. वाहन खरेदी कराल.

धनु राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण वरदानापेक्षा कमी नसेल. व्यवसायाशी संबंधित फिरायला जाल. खर्चामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. कर्ज देणे टाळा अन्यथा वेळेवर पैसे मिळू शकणार नाहीत. डोकेदुखी आणि डोळ्यांची समस्या उद्भवतील. जोडीदारासोबतचे संबंध सुरळीत होतील. नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल.

मकर राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मकर राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे अनेक अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहिल. नवीन जोडप्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. खाण्याच्या सवयींबद्दल सावध राहा. चांगला आहार घ्या.

कुंभ राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मंगळ संक्रमणाच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला कौटुंबिक कलह आणि मानसिक शांतता भंग होईल. ध्यान आणि योगासनावर विशेष लक्ष द्या. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय माहिती मिळू शकते. प्रवास काळजीपूर्वक होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर संधी अनुकूल राहिल. वैवाहिक जीवनात रोमँटिक ट्विस्ट येऊ शकतात. व्यवसायासाठी तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो.

मीन राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या प्रभावामुळे शौर्य वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला महत्वाकांक्षा आणि इच्छा पूर्ण होतील. नोकरीसाठी शुभ काळ आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक संस्थांमध्ये सहभागी व्हाल. परदेशी नागरिकत्वासाठी प्रयत्न करण्यासाठी अनुकूल संधी असेल.

Source link

mangal gochar 2024Mangal Guru Gochar 2024 HoroscopeMangal Sankraman 2024Mars Transit 2024मंगळ गोचर २०२४मंगळ संक्रमणाचा प्रभावमंगळ-गुरु गोचरमंगळ-गुरु संयोगवृषभ राशीत मंगळाचे संक्रमण१२ राशींवर कसा परिणाम होईल
Comments (0)
Add Comment