मध्यरात्री भूस्खलन, दोन बस नदीत कोसळल्या, वाहून गेल्या; ६५ प्रवासी बेपत्ता, एकच खळबळ

काठमांडू: नेपाळमध्ये भूस्खलनामुळे २ बस नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. भूस्खलन झाल्यामुळे २ बस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या बसमध्ये किमान ६५ प्रवासी होते. ते बेपत्ता आहेत. चितवन जिल्ह्यातील सिमतलाल भागात असलेल्या नारायणघाट-मुगलिंग मार्गावर भूस्खलन झालं. त्यानंतर दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. मुसळधार पावसामुळे त्रिशूल नदीतील पाणी पातळी वाढली आहे. प्रवाहाचा वेग वाढलेला आहे.

चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन बसमध्ये ६५ पेक्षा अधिक प्रवासी आहेत. यात भारतीयांचादेखील समावेश आहे. दुर्घटनेची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात सापडलेली, नदीत वाहून गेलेली एक बस बिरगंजहून काठमांडूला जात होती. नेपाळमध्ये सध्या सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
SpiceJet Airlines च्या कर्मचारी महिलेने CISF जवानाच्या कानशिलात लगावली, धक्कादायक कारण समोर, पाहा व्हडिओ
मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूला जाणाऱ्या एंजेस बसमध्ये २४ प्रवासी होते. तर काठमांडूहून गौरला जाणाऱ्या गणपती डीलक्स बसमध्ये ४१ प्रवासी होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास अपघात झाला. दोन्ही बस वाहून गेल्या. गणपती डीलक्स बसमधील तिघांनी बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त बसेसमध्ये भारतीय प्रवासीदेखील होते.
बायको शिकली, सरकारी नोकरदार झाली; मग तिनं केलेल्या कृत्यानं पतीची झोप उडाली
पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण क्षमतेनं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ‘नारायणघाट-मुगलिंग मार्गावर सिमल्टारमध्ये भूस्खलन होऊन जवळपास ६० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे मला अतिव दु:ख झालं आहे. गृह प्रशासनासह सर्व सरकारी विभागांना बेपत्ता प्रवाशांना शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असं दहल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Source link

nepal accidentnepal bus swept away in rivernepal landslideनेपाळ अपघातनेपाळ दुर्घटनानेपाळ बस नदीत वाहून गेल्यानेपाळ भूस्खलनबस नदीत वाहून गेल्या
Comments (0)
Add Comment