सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातचंदनाच्या झा�

पुणे,दि.१२:- पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या चंदनाची झाडे चोरट्यांनी पाच चंदन झाडे कापून नेली. ही घटना 18 जून रोजी मध्ये रात्री घडली असून याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनकाडून चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

याबाबत जगन्नाथ शंकर खरमाटे (वय 58, रा. नवी सांगवी) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात नोकरी करतात.

वनस्पती शास्त्र विभागाध्ये ‘बोटॅनिकल गार्डन’ आहे. या उद्यानात दोन चंदनाची झाडे होती. शाहू महाराज पुतळ्याशेजारी तीन चंदनाची झाडे होती. चोरट्यांनी 18 जून रोजी या उद्यानातील चंदनाची झाडे कापून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 26 जून रोजी शाहू महाराज पुतळ्याजवळ असलेली चंदनाची तीन झाडे कापली. परंतु ही झाडे चोरट्यांना नेता आली नाहीत. दुसऱ्या दिवशी रात्री चोरटे झाडे नेण्यासाठी विद्यापीठ आवारात आले. मात्र याबाबत सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु चोरटे पसार झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस करीत आहेत.

Comments (0)
Add Comment