२०५० पर्यंत १० देशांमध्ये सुसाट वेगानं वाढणार मुस्लिम लोकसंख्या; भारताचा नंबर कितवा?

Muslim Population in Worldwide : पूर्ण देशात मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसते अशातच फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार २०५० मध्ये जगभरात मुस्लिम धर्मीयांची संख्या आणखी झपाट्याने वाढलेली असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जनसंख्येवर आधारित रिपोर्टमध्ये मुस्लिम समाज जगात ख्रिश्चन समाजाच्या बरोबर तुलनेने असेल असा अंदाज फोर्ब्सने वर्तवला आहे. यामध्ये दहा देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढेल यांची सुद्धा नावे नमूद करण्यात आली आहे. यामधील टॉप पाच देशांचा आपण आढावा घेववूया.

पहिले नाव आहे नायझेरिया देशाचे, पण त्याआधी भारतातील काय परिस्थिती आहे आपण पाहून घेववूया, टॉप टेन देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. मुस्लिम समाजाच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येत भारतसुद्धा पुढे आहे. भारतात २०५० पर्यंत मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत ४६ टक्के वाढ होईल, म्हणजे भारतात २०५० पर्यंत जवळपास ३१०.६६ दक्षलक्ष इतकी लोकसंख्या मुस्लिम समाजाची देशात असेल.
लोकसंख्येचे ओझे नव्हे, संपत्ती!

आता आपण इतर देशांवर नजर टाकूया यामध्ये नायझेरियामध्ये जगातील सर्वाधिक मुस्लिम समाज असेल, १२० टक्क्यांनी मुस्लिम समाजाची वाढ एकट्या फक्त नायझेरियात होणार आहे, जवळपास २३० .७ दक्षलक्ष मुस्लिम समाजाची लोकसंख्या एकट्या फक्त नायझेरियात २०५० साली असेल. तिसरा क्रमांक लागतो पाकिस्तानचा,मुस्लिम देश म्हणून जगात पाकिस्तानची ओळख आहे. २०५० पर्यंत पाकिस्तानमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ होईल, आणि मुस्लिम लोकसंख्येचा आकडा २७३. ११ दक्षलक्ष इतका असेल.


चौथ्या क्रमांकावर आहे इराक, इथे पूर्णपणे मुस्लिम समाज असून इराकमध्ये लोकसंख्या दुप्पटीने वाढणार आहे म्हणजे, आता ५० हजार असतील तर २०५० पर्यंत एक लाख होतील, इराकमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ होईल म्हणजे २०५० पर्यंत लोकसंख्या इराकची ८०.१९ दक्षलक्ष इतकी असेल. पाचव्या क्रमाकांवर आहे वेस्ट अफ्रिकामधील नायझर तिथे लोकसंख्या २०५० पर्यंत १४८ टक्क्यांनी वाढेल म्हणजेच २०५० पर्यंत तिथली लोकसंख्या ५३.६६ दक्षलक्ष असेल. यामध्ये पुढे बांग्लादेश, अफगाणिस्तान, मिस्त्र (इजिप्त), यमन आणि इंडोनेशिया देशांची नावे आहे जिथे लोकसंख्या सर्वाधिक झपाट्याने वाढेल.

Source link

forbes report on muslimIndia’s Muslim Populationmuslim community in worldwidemuslim populationमुस्लिम लोकसंख्यामुस्लिम समाजमुस्लिम समाज लोकसंख्या आकडामुस्लिमांची टक्केवारी
Comments (0)
Add Comment