मुंबई विधान भवन येथे आज झालेले विधान परिषद निवडण

मुंबई,दि.१२:- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत महायुतीकडून 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली होती. अखेर या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत 100 टक्के मतदान पार पडलं आहे.

राज्यातील सर्व 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. निकाल समोर आला आहे.

या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली. या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार जिंकून आले आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निकाल रखडला होता. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत.

विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार कोणाला किती मते

1) पंकजा मुंडे. 26
2) परिणय फुके. 26
3) सदाभाऊ खोत. 26
4) अमित गोरखे. 26
5) योगेश टिळेकर. 26

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

1) शिवाजीराव गर्जे. 24
2) राजेश विटेकर. 23

शिवसेना
1) कृपाल तुमाने. 25
2) भावना गवळी. 24

शिवसेना ठाकरे गट

1) मिलिंद नार्वेकर. .24

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार

1) जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस. 12

1) प्रज्ञा सातव. 25

Comments (0)
Add Comment