अंमली पदार्थाविरोधात भंडारा पोलिसांची विशेष मोहीम,बाळगणारे व सेवन करणारे यांचेवर धडक कार्यवाही…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अंमली पदार्थाचे सेवन व  बाळगणा-यांविरूध्द भंडारा पोलिसांची धडक कार्यवाही….

कारधा(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नजिकच्या काळात नवीनपिढी हि अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ सेवन करणा-यांवर व बाळगणा-यांवर धडक कार्यवाही सुरू केलेली असून सन २०२४ मध्ये अंमली पदार्थ
कायद्याखाली एकुण २६ कार्यवाही करण्यात आलेली आहे.

त्यापैकी अंमली पदार्थ (गांजा) बाळगणारे व वाहतुक करणा-यांवर ४ कार्यवाही करून गुन्हे दाखल केलेले असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही मध्ये एकुण ४४.६७१ किलो ग्रॅम गांजा किंमती ५,३८,३३०/- रूपयांचा जप्त करण्यात आलेला आहे आणि अंमली पदार्थ (गांजा) सेवन करणा-यांवर २२ कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे अंमली पदार्थ सेवन करणे हे समाजासाठी किती हानिकारक आहे याबाबत जिल्ह्यातील शाळा व कॉलेजेस मध्ये कार्यशाळा आयोजित करून अंमली पदार्थाच्या आहारी जावू नये असे सर्वांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हनुन जिल्ह्यातील पोलिस स्टेशन भंडारा व तुमसर यांनी दिनांक ११/०७/२०२४ रोजी अंमली पदार्थाचे सेवन करणारे निहार प्रदिप महाकाळकर वय २३ वर्ष रा. सिव्हील लाईन भंडारा आणि कमलेश नत्थु चोपकर वय ५१ वर्ष रा. विवेकानंद नगर तुमसर यांचे वर कार्यवाही करून गुन्हे दाखल केलेले आहे.

त्याचप्रमाणे दि १२/०७/२०२४ रोजी पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, पोलिस स्टेशन कारधा यांनी त्यांना मिळालेल्या खबरेवरून पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलिस अधीक्षक, ईश्वर
कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, पवनी अति. कार्यभार उपविभाग भंडारा मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात कारधा चौक येथे नाकाबंदी करून एका वाहन अंदाजे किंमत ११,००,०००/- चा पकडला असून त्यामधून १७ किलो गांजा अंदाजे किंमत २,५५,०००/- रू. असा एकुण १३,५५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन कारधा येथे अंमली पदार्थ कायद्यान्वये
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरच्या दोन्ही  कार्यवाही पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,
पवनी तथा अति. कार्यभार उपविभाग भंडारा मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ पोलिस स्टेशन कारधा व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधिक्षक लोहीत मतानी  यांनी भंडारा जिल्ह्यातून अंमली पदार्थाचा समुळ नाश करणे करीता भंडारा जिल्हा वासियांना आवाहन केले आहे की, त्यांनी अंमली पदार्थ सेवन करणारे,
बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरूध्द भंडारा जिल्हा पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणा-यांचे नाव भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे गुप्त ठेवण्यात येईल.

Comments (0)
Add Comment