WhatsApp Context Card Feature: व्हॉट्सॲप या प्लॅटफॉर्मचा भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा वेळी अनेक युजर्सने वेळोवेळी आपल्या सोबत काही चुकीचे घडल्याची तक्रार केली आहे. यावर तोडगा म्हणून कंपनीने नवीन फिचर लाँच केले आहे. जे यूजर्सच्या सेफ्टीसाठी काम करेल. कसे ते जाऊन घेऊया.
कॉन्टेक्स्ट कार्ड फिचर तुम्हाला कोणत्याही ग्रुपचे डिटेल्स देईल ज्याचे इन्व्हीटेशन तुम्हाला मिळाले आहे. या फीचरच्या स्क्रीनशॉटनुसार, आपल्याला समजते की ज्या व्यक्तीने तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी इन्व्हीटेशन पाठवले आहे किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केले आहे ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे की नाही. जर कोणी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केले असेल तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. याच्या मदतीने तुम्ही ग्रुपमधून लेफ्टही होऊ शकता. याशिवाय ग्रुपचे इन्व्हीटेशन कधी आले आहे आणि तो कधी बनवला गेला याचीही माहिती मिळेल.
तुम्ही सेफ्टी फीचरच्या मदतीने तुम्ही मेसेजला रिपोर्ट करू शकाल
व्हॉट्सॲपच्या व्हिडिओनुसार, सेफ्टी फीचरच्या मदतीने तुम्ही ग्रुपमधील कोणत्याही मेसेजला रिपोर्ट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला मेसेजवर लाँग टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला रिपोर्टचा पर्याय मिळेल. तुम्ही कोणत्याही मेसेज रिपोर्ट केल्यास, त्याचे थेट नोटीफिकेशन कोणालाही पाठवली जाणार नाही. या व्यतिरिक्त, ग्रुपला रिपोर्ट करण्यासाठी ग्रुप चॅट इन्फो या पर्यायावर जावे लागेल. तुम्ही पूर्ण ग्रुपला रिपोर्ट केल्यास इतर कोणत्याही मेंबरला त्याबद्दल माहिती मिळणार नाही.
याशिवाय इतरही अनेक फीचर्सवर व्हॉट्सॲप काम करत आहे. नवीन फीचर अंतर्गत, व्हॉईस नोट्स व्यतिरिक्त, तुम्ही व्हिडिओ नोट्स देखील बनवू शकता. याच्या मदतीने तुम्ही छोटे व्हिडिओ बनवून पाठवू शकता. याशिवाय आता मेसेज व्यतिरिक्त तुम्ही चॅनलमध्ये GIF देखील पाठवू शकता. त्याच वेळी, व्हॉट्सॲप कॉलवर डायलर फीचर जोडण्याची तयारी करण्यात आली आहे. या फीचरमुळे तुम्ही नंबर डायल करून कॉल करू शकाल.