लोणावळा सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाने पकडला ४८ किलो गांजा,३ आरोपी अटकेत…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक धडाकेबाज कारवाई; 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना घेतले ताब्यात….

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची धडाका सुरु आहेच  परंतु तरीही गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती.

त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

त्याअनुषंगाने दिनांक 11/07/2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.11/07/2024 रोजी पहाटे 03.05 वाजताच्या सुमारास जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबल्याने कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिस पथकाने जागेवरच  इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे सोबत असलेल्या चारचाकी वाहनाचे डिक्किमधील दोन पोत्यांमध्ये रू.9,20,000/- किमतीचा 48 किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाई मध्ये 1)नितीन शिवाजी लेहने, वय 38 वर्ष, रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड, 2)संदिपान पाटलोबा गुट्टे, वय 39 वर्ष, राहणार परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड, 3) गणेश सुरेश दराडे, वय 30 वर्ष, राहणार केज, तालुका केज, जिल्हा बीड यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण पो.स्टे येथे आणून सदरबाबत पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. गु र.न. 223/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये 48 किलो गंजासह एकूण रु.14,60,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, नापोशि दत्ता शिंदे, पोशि गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment