मूलांक 1 – गुंतवणुकीत वडिलांचा सल्ला घ्या.
मूलांक 1 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला जाईल. आज तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल असे काम तुम्ही करून दाखवाल. आज वडिलांच्या सल्ल्याने पैशांची गुंतवणूक करा, त्यामुळे धनलाभ होईल. आज कुटुंबीयांसोबत एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन कराल. जोडीदासोबत संबंध मधुर राहतील. एकूण आजचा दिवस सुखद राहील.
मूलांक 2 – थकलेले पैसे हाती येतील
मूलांक 2 असलेल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग आहेत. थकलेले आणि तुम्ही विसरून गेलेले पैसे आज हाती येतील. आजचा दिवस व्यापारात भार चांगला आहे. व्यापार विस्तारासाठी नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक बाबतीत विचार करता तुम्ही कुटुंबात एकाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कराल, त्यामुळे घरी उत्सवी वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित होईल.
मूलांक 3 – व्यापार विस्तारात गुंतवणूक करा
मूलांक 3 असलेल्या जातकांना आजचा दिवस फार चांगला जाईल. व्यापार विस्ताराच्या कामात पैशांची गुंतवणूक करावी, याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख प्राप्ती होईल. जोडीदारासोबत घरी एखाद्या धार्मिक कार्यकामाच्या आयोजनाबद्दल चर्चा कराल. एकूण विचार करता आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 4 – आजचा दिवस अडचणींचा
मूलांक 4 असलेल्यांना आजचा दिवस अडचणींचा आहे. आज तुम्ही विचार केलेली कामे होता होता बिघडून जातील. मुलाची प्रकृती अचानक बिघडू शकते, त्यामुळे कौटुंबिक अडचणी वाढू शकतात. व्यापारात आज नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. त्यातून जोडीदाराबद्दलही तुमच्या स्वभावात कोरडेपणा राहील. आज गोरगरिबांना अन्नदान करावे, असा तुम्हाला सल्ला राहील, ज्यातून तुम्हाला लाभ होतील.
मूलांक 5 – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील
मूलांक 5 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला राहील. तुम्ही विचार केलेली सर्व कामे आज पूर्ण होतील. आज नवीन व्यापार सुरू करण्याबद्दल विचार करू शकाल. यामध्ये बहिणी किंवा कन्येचा सल्ला उपयोगी ठरेल. कुटुंबाकडून आज आनंदाची बातमी मिळेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 6 – कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता
मूलांक 6 असलेल्यांना आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला पैशांची चणचण भेडसावे, कारण पैशांची आवक कोठे तरी थांबेल. त्यामुळे तुम्हाला आज मानसिक तणाव जाणवू शकतो. कुटुंबातीस सदस्यांसोबत काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सल्ला राहील की आज तुम्ही बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज कटू भाषेचा वापर टाळा. आज जोडीदाराला पूर्ण पाठबळ द्या, यातून जवळच्या भविष्यात चांगले लाभ होतील.
मूलांक 7 – जोडीदारासोबत वाद होतील
मूलांक 7 असलेल्यांना आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमच्या होत आलेल्या कामात काही अडथळे येतील, त्यामुळे जीवनात सुखाची कमतरता राहील. आज खासगी जीवनाकडे विशेष लक्ष द्या. आज पायाशी संबंधित काही व्याधी त्रास देऊ शकते. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. जोडीदारासोबत आज वाद वाढू शकतात, त्यामुळे आज शांत राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा. उपाय म्हणून आज सूर्याला जल अर्पण करावे, लाभ होतील.
मूलांक 8 – आईची प्रकृती बिघडू शकते
मूलांक 8 असलेल्यांना आज त्रासाचा आणि धावपळीचा दिवस आहे. आज तुम्हाला आर्थिक समस्यांचा समाना करावा लागू शकतो आणि आज अनावश्यक खर्चही वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या त्रस्त असाल. आज तुमच्या आईची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण राहील. आज तुमचा राग वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला सल्ला राहील की आज थोडा संयम ठेवा.
मूलांक 9 – कुटुंबात आनंदाचे वातावरण
मूलांक 9 असलेल्यांना आजचा दिवस उत्तम राहील. आज कुटुंबात ते दिवसभर आनंदाचे वातावरण राहील, तसेच आज कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याचे निश्चित कराल. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. आज थकलेले पैसे हाती येतील. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ राहील. आज नवीन कामच्या आरंभासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वर्तणूक ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल, हे आज लक्षात ठेवा. एकूण विचार करता आजचा दिवस फार चांगला जाईल.