महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
अंमली पदार्थ गांजासह फरार आरोपीस घेतले ताब्यात,५३२ ग्रॅम गांजा केला जप्त…
हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(10) रोजी हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी हिंगणघाट शहरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहिती मिळाली की हिंगणघाट शहरातील टाका ग्राऊंड जवळ राहनारा रेकार्डवरील आरोपी शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड हा गांजा बाळगुन आहे
या माहीतीची शहानिशा करुन सदरची माहीती पोलिस निरीक्षक. मनोज गभणे पोलिस स्टेशन हिंगणघाट यांना देऊन यांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथील टाका ग्राउंड जवळ राहणारायाचे घरी गांजा बाबत रेड केला असता शेख युसुफ शेख करीम याचे घराची घरझडती घेतली असता त्यात ओलसर गांजा वजन 532 ग्रॅम अंदाजे किंमत 15,960/- रू. चा माल त्याचे घरी मिळुन आल्याने सदरचा गांजा मौका जप्त पंचनामा करुन जप्त करण्यात आला व शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष याचे विरूध्द एन डी पी एस कायदयान्वये गुन्हा नेांद करण्यात आला
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक, डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज गभणे ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देऱ्नुशासार पोउपनि लक्ष्मीकांत दुर्गे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देशमुख, सुनिल मळणकर, नापोशि नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, रूपेश रघाटाटे, पो. शि. विजय हारनुर, यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.