Crime News: प्रेयसी अन् तिच्या लेकराच्या हत्येचा कट; CID अधिकाऱ्यानं रचलं भयंकर कारस्थान, कारण काय?

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने आपल्या प्रेयसीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. दरम्यान प्रेयसीने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला होता. पण त्याला हे मान्य नसल्याने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला. आणि एक दिवस त्याने उदयपूर येथून आपल्या कार्यालयातून रजा घेतली आणि मायलेकाला घेऊन जयपूरला पोहोचला. वाटेतच निंदड परिसरात त्यांच्यात झटापट झाली आणि त्याने आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला आणि तेथून पसार झाला. पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता हरमदा भागातील निंदड टेकडीवर कोणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती मिळाली होती. ज्यामध्ये एक महिला आणि बालक गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या दोघांचेही जबाब नोंदवले आहेत.
Ahmednagar News: पोलीस कर्मचाऱ्याची ट्रक चालकाला अमानुष मारहाण, व्हिडिओ, कॅमेऱ्यात कैद, नेमकं प्रकरण काय?
आई एमएस गीता देवी आणि मुलगा आशिष अशी जखमींची नावे असून ते बांसवाडा येथील रहिवासी आहेत. दोघांनी आपल्या जबाबात सांगितले की, हल्लेखोर खरग सिंग जॉन हा सीआयडीमध्ये एएओ पदावर कार्यरत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी तात्काळ त्याचा मोबाईल ट्रेस केला आणि त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी म्हणाला, उदयपूर येथे नोकरी करण्याआधी तो बांसवाडा येथे कार्यरत होता. यादरम्यान गीता देवीशी त्याची ओळख झाली होती. ते एकमेकांसोबत राहू लागले आणि गीता त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, ज्यासाठी तो तयार नव्हता. यापासून वाचण्यासाठी म्हणून त्याने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या उदयपूर कार्यालयातून दोन दिवसांची रजा टाकली आणि गीता, आशिषला जयपूरला बोलावले.
Mumbai Hit And Run: मिहीर शहा प्रचंड प्यायला होता, पण…; पोलिसांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोघांना वाटेतच विषारी पदार्थ खाण्यास दिला होता, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले आणि आरोपीने आपला डाव साधला आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्यांचा मुलगा मोठ्याने ओरडत होता. हा आवाज कानी पडताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले पण आरोपी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अगदी काही तासांतच त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Source link

CID Officermurder caseofficer Conspiracy to murderpolice probe in murder caserajasthan newsजयपूर पोलीसप्रेयसीच्या हत्येचा कटसीआयडी ऑफिसरचा प्रतापसीआयडी ऑफिसरवर गुन्हा दाखलहत्येची खळबळजनक बातमी
Comments (0)
Add Comment