रागाचे भरात पतीनेच केला महीलेचा खुन, खुनाचे गुन्हयात तिचे पतीस अटक…
वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(१०)जुलै रोजी पो.स्टे. वरुड हद्दीतील ग्राम एकलविहीर येथील तक्रारदार शेखर शालीकराम धुर्वे, रा. एकलविहीर, याने तक्रार दिली की, त्याची आई निला शालीकराम धुर्वे वय ५२ रा. एकलविहीर ता. वरुड जि.अमरावती ही दि.०९/०७/२०२४ चे सायंकाळ दरम्यान बकरी चारण्या करीता घराशेजारील जंगलात गेली असता ती परत आली नाही. कुटुंबातील व गावातील ईतर लोक यांच्या मदतीने तिचा शोध घेतला असता दि.१०/०७/२०२४ रोजी सकाळी ०८/०० वा दरम्यान तिचा मृतदेह जंगलातील नाल्यात पडुन असलेला आढळुन आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली असल्याचे प्राथमीक दृष्टया दिसुन येत असल्याने पो.स्टे. वरुड येथे खुनाचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु होता
सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत .यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघड करुन गुन्हयातील आरोपीस अटक करण्याबाबत मार्गदर्शीत केले होते. गुन्हयाचा तपास करण्या करीता पो.स्टे. वरुड व स्थानिक गुन्हे शाखा येथील संयुक्त पथके तयार करण्यात आली होती तपासा दरम्यान सर्व संभाव्य कारणांची मिमांसा करीत
असतांना माहीती मिळाली की, मृतक हीचे तिचा पती शालीकराम धुर्वे, वय ५५ रा. एकलविहीर याचेसोबत पटत नव्हते तसेच घटनेच्या एक दिवस अगोदर दोघांमध्ये पैशाचे कारणावरुन कडाक्याचे वाद सुध्दा झाला होता.
प्राप्त माहीतीच्या आधारे मृतक हीचा पती यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली तसेच तो सांगत असलेल्या कथनात येत असलेल्या विसंगतीमुळे पोलिसांनी त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने त्याची पत्नी सोबत त्याचे पटत नसल्याचे व ती नेहमी त्याचा अपमान करून शिविगाळ करीत होती या कारणांचे रागातुन दि.०९/०७/२४ चे सांयकाळी गुरे चारण्याकरीता जंगलात गेलेल्या पतीस गुरे परत आणण्या करिता मदत करण्यास गेली असता त्याने प्रथम तिचा गळा आवळला त्या दरम्यान ती बेशुध्द झाली नंतर कु-हाडीने तिचा गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येनंतर त्याने पत्नी दिसत नसल्याचा बनाव करुन गावातील लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी पतीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास वरुड पोलिस करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागिय पोलिस अधिकारी,मोर्शी डॉ. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे, , स्था.गु.शा.पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, ठाणेदार, पो.स्टे. वरुड नेतृत्वात पोउपनि. नितीन चुलपार, नितीन इंगोले अंमलदार राजु मडावी, गजेन्द्र ठाकरे, सचीन मिश्रा, बळवंत दाभणे, शकील
चव्हाण,रविन्द्र बावणे, भुषण पेटे, पंकज फाटे,राजु चव्हाण, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.
The post महीलेच्या खुनाचे गु्न्ह्यात पतीच निघाला खुनी.. appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.