वर्गात तास सुरु, विद्यार्थी अभ्यासात मग्न; तितक्यात फिरता पंखा एकाएकी पडला अन् मग…

भोपाळ : मध्यप्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत आगळी घटना घडली आहे. शाळेतील तिसरीच्या वर्गात एका विद्यार्थीनीच्या अंगावर फिरता पंखा पडला आहे. यामध्ये विद्यार्थीनी जखमी झाली असून तिच्यावर भोपाळ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तसेच सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

घटना आहे मध्यप्रदेश जिल्ह्याच्या आष्टा येथील. गुरुवारी एका खाजगी शाळेत तास सुरु असताना विद्यार्थीनीवर फिरता पंखा पडला आणि एकच गोंधळ झाला. हा पंखा तिच्या हातावर पडला आहे. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्या हाताला दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पत्नीला गायिका करण्यासाठी राबला ड्रायव्हर पती; ती स्टार झाली अन् भलतंच करुन बसली
विद्यार्थीनीची अवस्था पाहून शाळा प्रशासनाने तात्काळ विद्यार्थीनीला त्याच भागातील रुग्णालयात हलवण्यात आले. पण तेथे अपेक्षित उपचारांची कमी असल्याने तिला भोपाळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच गटशिक्षण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी शाळेत पोहोचले आणि शाळेची पाहणी केली आहे. यादरम्यान त्यांनी भविष्यात संभाव्य धोका टाळण्यासाठी शाळा प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शन केले आहे.
Waterfall Incident: धबधब्यात पिकनिकचा आनंद, अचानक वाढला प्रवाह; पर्यटक अडकले, मदतीसाठी आक्रोश सुरु अन् मग…
सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे वर्ग पूर्ण भरला आहे आणि शिक्षक शिकवत आहेत. इतक्यात अचानक पंखा पडतो आणि वर्गात एकच गोंधळ उडतो. पंखा विद्यार्थीनीच्या हातावर पडतो, शिक्षक तात्काळ तिला पाहायला धावतात आणि नंतर स्टाफला बोलावून घेतात पुढे विद्यार्थीनीला तात्काळ बाहेर काढले जाते.

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर अजब सिंग राजपूत या प्रकरणाबाबत बोलताना सांगतात, शाळा व्यवस्थापनाने एका खाजगी शाळेतील पंखा अचानक पडल्याने विद्यार्थी जखमी झाली. विद्यार्थिनीला आता भोपाळला हलवले आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Source link

fan fell onincident with studentmadhya pradesh newsMadhya Pradesh school educationschool incidentमध्य प्रदेश मधील घटनामध्य प्रदेश शालेय शिक्षण मंत्रालयशालेय विद्यार्थीनीसोबत घटनाशाळेतील घटनासीसीटिव्ही व्हिडीओ व्हायरल
Comments (0)
Add Comment